नववर्षात बॉलिवूडमधील एका नवीन जोडीची खूप चर्चा आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि ‘डार्लिंग्स’ फेम विजय वर्मा एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलंय. नववर्षाच्या पार्टीत दोघांना एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबदद्ल चर्चा सुरू झाली होती. आधी त्या व्हिडीओत दिसलेले ते दोघेच आहे की नाही याबद्दल शंका होती, पण नंतर मात्र ते तमन्ना आणि विजय असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दोघेही एअरपोर्टवर एकत्र दिसले होते.

आता पुन्हा एकदा एका इव्हेंटमध्ये तमन्ना आणि विजयने लक्ष वेधून घेतलं आहे. इव्हेंटमधील फोटोसाठी पोज देतानाचा दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तमन्ना भाटिया निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या ट्रॉफीबरोबर एकटीच पोज देताना दिसत आहे आणि मग विजय वर्मा फ्रेममध्ये येतो. तो तिच्या पाठीमागून त्याची ट्रॉफी दाखवत पुढे जातो, नंतर परत येतो आणि तमन्नाबरोबर पोज देतो. यावेळी विजयने रंगीबेरंगी जॅकेट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहींनी ‘विजय तमन्नापेक्षा चांगला अभिनय करतो’, ‘विजय जस्टीन बिबरसारखा दिसतोय’, असं म्हटलंय. तर काहींनी त्या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, काहींनी मात्र त्यांना ट्रोल केलंय. ‘ही हिरोईन याला कशी काय पटली’, ‘बकवास जोडी’, ‘लंगूर के मूंह मे अंगूर’ अशा कमेंट्स काही जणांनी करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.