अभिनेत्री तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघेही मागच्या चार वर्षांपासून एकत्र होते, पण त्यांनी परस्पर सहमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर, आदर हा रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा आहे. तारा व आदर रणबीर कपूरच्या लग्नात आणि ख्रिसमस पार्टीतदेखील एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. अद्याप त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तारा सुतारीया आणि आदर जैन विभक्त; ब्रेकअपनंतर घेतला ‘हा’ निर्णय
तारा व आदरच्या ब्रेकअपबद्दल चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री ४ जानेवारी रोजी एअरपोर्टवर स्पॉट झाली. ताराने शॉर्ट ब्लॅक ड्रेस आणि ब्राऊन लेदर जॅकेट परिधान केलं होतं. तिला एअरपोर्टवर पाहताच पापराझींनी गर्दी केली. तारादेखील पोज देताना दिसून आली. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढताना त्यांनी ब्रेकअप बद्दल प्रश्नही विचारला. ‘तुमच्या ब्रेकअपबद्दल बातम्या येत आहेत, त्या खऱ्या आहेत का?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला, त्यावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. थोडा वेळ पोज दिल्यानंतर ती ‘थँक्यू’ बोलून तिथून पुढे गेली.
तारा व आदर दोघांची ओळख त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघे एकत्र वेळ घालवू लागले होते. मात्र, चार वर्षांनंतर आता ते वेगळे झाले आहेत. आदरने २०१७ मध्ये ‘कैदी बँड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. तारा सुतारिया नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तारा लवकरच ‘अपूर्व’ चित्रपटात दिसणार आहे.