बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीजपैकी एक आहे. अजय देवगणच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ‘सिंघम’ या चित्रपटाचे नाव निश्चितपणे टॉप लिस्टमध्ये सामील होईल. अजयने आतापर्यंत सिंघम आणि सिंघम रिटर्न्समधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. यापूर्वी रोहित शेट्टीने अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
आता मात्र ‘सिंघम अगेन’च्या रिलीज डेटबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजयच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि तज्ञ तरण आदर्श यांच्याकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन पोस्ट शेअर करत म्हंटलं की, “दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ दिवाळी २०२४ च्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”
आणखी वाचा : स्लीट ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा हॉट अंदाज; लॅकमे फॅशन वीकनिमित्त अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट व्हायरल
याआधी रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील शेवटचे दोन भाग ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’ पुढील वर्षीच्या दिवाळीत काय कमाल दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. याबरोबरच रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीर सिंगच्या ‘सिंबा’ आणि अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चीसुद्धा धमाकेदार एंट्री झाली आहे.
तरण आदर्श यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार यावर्षी जुलै महिन्यापासून रोहित शेट्टी आणि अजय देवगण ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत. तरण आदर्श यांच्या या पोस्टमुळे अजय देवगणच्या चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. या चित्रपटात नेमकी कोणती सरप्राइज बघायला मिळणार आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा रेकॉर्डब्रेकिंग कमाई करणार का हे येणारा काळच ठरवेल.