सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरीही या सगळ्या वादाचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले. आता महिन्याभरानंतर हळूहळू चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

हेही वाचा : “अभिनेता हा घर बांधणाऱ्या गवंड्यासारखा…” वैभव मांगले यांचे स्पष्ट मत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…

दिग्दर्शक सुदीप्तो सेन आता निर्माते संदीप सिंग यांच्याबरोबर काम करणार आहेत. शनिवारी ट्विटरवर सुदीप्तो सेन यांनी यासंदर्भात घोषणा केली, तसेच हातात २५ हजार कोटींचा धनादेश धरलेल्या माणसाचा फोटो त्यांनी शेअर केला. त्यांचा आगामी चित्रपट ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.

हेही वाचा : Video: मराठमोळ्या अभिनेत्याने लंडनच्या वॉशरुममध्ये पाहिली खास गोष्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला “ही खरी समानता…”

ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय १० जून रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. यानिमित्ताने बायोपिकची घोषणा करण्यात आली असल्याचे सुदीप्तो सेन यांनी सांगितले आहे. निर्माते संदीप सिंग, डॉ. जयंतीलाल गडा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी या बायोपिकची घोषणा केली, चित्रपटाचे नाव ‘सहाराश्री’ असेल.

हेही वाचा : जितेंद्र जोशीची लेकीसह लंडनवारी; भावुक पोस्ट करत म्हणाला “रेवा, १३ महिन्यांची असताना…”

२०१२ मध्ये इंडिया टुडेने सुब्रत रॉय यांना वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून घोषित केले होते. भारतात रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण केल्या म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकातही करण्यात आला होता. या चित्रपटात त्यांच्या संघर्षापासून ते देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्याचा त्यांचा प्रवास दाखवला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सहाराश्री’ चित्रपटाचे गीतकार गुलजार, तर संगीताची जबाबदारी ए.आर.रहेमान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सध्या सुब्रत रॉय यांची भूमिका कोण साकारणार याबाबत निर्माते अजूनही संभ्रमात आहेत. या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सशी बोलणी सुरू आहेत.