नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटानंतर अभिनेत्याबरोबरच्या अफेअरमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सोभिता धूलीपाला ही तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. सोभिता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांच्या संपर्कात असते. २०१३ मध्ये ‘मिस अर्थ’ झाली तेव्हा तिच्या रंग आणि रुपावरुन बऱ्याच लोकांनी तिला वेगवेगळे सल्ले दिले. याचा मात्र तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीवर काहीही परिणाम झाला नाही.

सोभिताने २०१६ च्या अनुराग कश्यपच्या ‘रमण राघव २.०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं अन् आपल्या अभिनय करिकीर्दीला सुरुवात केली. चित्रपटात येण्याआधी तिने जाहिरातीतूनही काम केलं आहे. यावेळी तिला आलेल्या अनुभवाबद्दल इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना तिने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “हा रावण आहे की तस्कर…” ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांची सैफ अली खानवर टीका

ज्यावेळी तिने चित्रपटक्षेत्रात पाऊलही ठेवलं नव्हतं तेव्हापासूनच तिला तिच्या रंगावरुन सौंदऱ्यावरुन बऱ्याच लोकांनी सल्ले दिले. सोभिता म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखादी नवी गोष्ट सुरू करता तेव्हा तुम्हाला बराच संघर्ष करावा लागतो. मी चित्रपटक्षेत्राशी जोडलेली नाही. मला आजही आठवतं की जेव्हा मी जाहिरातीसाठी ऑडिशन द्यायचे तेव्हा बरीच लोक मला म्हणायचे की मी फारशी गोरी आणि म्हणावी तितकी सुंदर नाही. हे सगळं लोक मला माझ्या तोंडावर सांगायचे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचदरम्यान तिने काहीतरी हटके करायचं ठरवलं आणि अशातच तिच्याकडे अनुराग कश्यपचा ‘रमण राघव २.०’ आला. सोभिताला चित्रपटसृष्टीत एक स्टार म्हणून नव्हे तर एक अभिनेत्री म्हणून यायचं होतं हे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. प्राइम व्हिडीओच्या ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमुळे सोभिताला खरी ओळख मिळाली अन् तिने आता ओटीटी क्षेत्रातही चांगलंच नाव कामावलं आहे. आता ती आदित्य रॉय कपूर, अनिल कपूरसह ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे. याचा पहिला सीझन लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला.