सध्याच्या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन्स किंवा एखादा किसिंग सीन ही गोष्ट फारच किरकोळ झाली आहे. बरेच अभिनेते आणि अभिनेत्री यांनी त्यांची कित्येक वर्षांपासूनची नो किसिंग पॉलिसी मोडल्याचं आपण ऐकलं आहे. नुकतंच तमन्ना भाटियाने ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये प्रथम ऑन स्क्रीन कीसिंग सीन दिला. यानंतर नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचंही नाव चर्चेत आलं. ‘द : ट्रायल’ सीरिजमध्ये काजोल वकिलाची भूमिका साकारत आहे.

काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये आजवर केव्हाच ऑनस्क्रीन किसिंग सीन केला नव्हता. मात्र, पहिल्याच ओटीटी सीरिजमध्ये काजोलने तिचा ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडला आहे. अभिनेत्रीच्या ‘द : ट्रायल’मधील बोल्ड सीनची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. काजोलचा नवरा आणि सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणही त्याच्या फिल्मी करिअरमध्ये ‘नो किस पॉलिसी’ अवलंबली होती, पण अजयनेही स्वतःच्याच चित्रपटात ती पॉलिसी मोडली होती.

आणखी वाचा : एयरपोर्टवर पंकज त्रिपाठी यांना कुटुंबासह पाहताच पापाराझींनी केली फॅमिली फोटोची मागणी; अभिनेता म्हणाला…

२०१६ मध्ये अजय देवगणनेच दिग्दर्शित केलेल्या ‘शिवाय’ या चित्रपटात अजयने अभिनेत्रीबरोबर प्रथमच ऑन स्क्रीन कीसिंग सीन दिला होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची काजोल ही सहनिर्माती होती. तिला चित्रपटातील या किसिंग सीनबद्दल काहीच ठाऊक नव्हते. जेव्हा अजय देवगण आणि काजोल यांनी कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली तेव्हा काजोलने याचा खुलासा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगणने प्रथमच काहीही न सांगता ऑन स्क्रीन कीसिंग सीन दिल्यावर काजोलने तिची प्रतिक्रिया या कार्यक्रमात दिली होती. काजोल म्हणाली, “त्याने याबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं, माझ्याकडून परवानगी घेण्याऐवजी त्याने तो सीन केला आणि सर्वात आधी माझी माफी मागितली.” अशारीतीने काजोलनेही नंतर अजय देवगणला माफ केलं होतं. अजय देवगण आता लवकरच त्याच्या ‘मैदान’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.