बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. टायगर आणि टायगर जिंदा है चित्रपटाप्रमाणेच टायगर ३ मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन लूक बघायला मिळणार आहे. टायगर ३’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

हेही वाचा- कंगना रणौतच्या ‘तेजस’ने १० दिवसात कमावले फक्त ५ कोटी, तब्बल ‘इतक्या’ बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाला प्रेक्षक मिळेना

प्रदर्शनाअगोदरच चित्रपटाची जबरदस्त कमाई

भारतात ५ नोव्हेंबर २०२३ पासून ‘टायगर ३’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत ‘टायगर ३’ ची सुमारे १ लाख ४० हजार तिकिटे विकली गेली आहेत. तर अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने ४.२ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या कमाईचे आकडे पाहता ३०० कोटीच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘टायगर ३’ मध्ये शाहरुख खानबरोबर हृतिक रोशन करणार कॅमिओ

‘टायगर ३’ मध्ये शाहरुख खानबरोबर हृतिक रोशनही कॅमिओ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ मध्ये शाहरुख आणि सलमान कॅमिओ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- विराट कोहलीने केलं ४९वे वनडे शतक; अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “स्वतःच्या वाढदिवसाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टायगर ३’बद्दल बोलायचं झालं दिवाळीच्या शुभमुहुर्तावर म्हणजे १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला हा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. टायगर ३ मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तामिळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.