Tiger Shroff sells Mumbai apartment: सध्या थिएटरमध्ये ‘परम सुंदरी’, ‘बागी ४’, ‘द बंगाल फाइल्स’, हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना कमी अधिक प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेला ‘बागी ४’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. ३ दिवसांत या चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत.

टायगर श्रॉफने मुंबईतील अपार्टमेंट इतक्या’ कोटींना विकले

आता मात्र अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या चित्रपटामुळे किंवा भूमिकेमुळे नाही तर त्याने त्याचे अपार्टमेंट विकल्यामुळे चर्चेत आला आहे. स्क्वेअर यार्ड्सनुसार अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील खार येथील एक अपार्टमेंट १५.६ कोटी रुपयांना विकले. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार हा व्यवहार सप्टेंबर २०२५ मध्ये झाला आहे.

मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, टायगर श्रॉफने विकलेले हे अपार्टमेंट रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये २२ व्या मजल्यावर आहे. त्याचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ १,९८९.७२ चौरस फूट असून या अपार्टमेंटला तीन कार पार्किंग स्लॉटदेखील आहेत.

या व्यवहारात ९३.६० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. स्क्वेअर यार्डच्यानुसार, अभिनेत्याने २०१८ मध्ये ११.६२ कोटी रुपयांना ही मालमत्ता खरेदी केली. आता या विक्रीनंतर त्याला ३१% नफा झाला आहे.

टायगर श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचे तर ए. हर्षा दिग्दर्शित आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट बॅनरखाली साजिद नाडियाडवाला निर्मित ‘बागी ४’ प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. टायगर व्यतिरिक्त, या चित्रपटात हरनाज कौर संधू, सोनम बाजवा आणि संजय दत्त यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दरम्यान, अभिनेता ‘बागी ४’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांना भेट देत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.