अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश व अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत आहेत. या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडिवरून अनफॉलो केलं आहे. अशातच तृप्तीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लोक तिच्याबद्दल काय विचार करतात, यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“तू माझ्या आयुष्यात…”, बॉयफ्रेंड अनिश जोगच्या वाढदिवसाला सई ताम्हणकरची खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी कर्णेश व तृप्तीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये कर्णेश तृप्ती डिमरीच्या गालावर किस करताना दिसत होता. पण आता दोघेही वेगळे झाल्याचं म्हटलं जातंय. अशातच तृप्तीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तृप्तीने लोकांबद्दलच्या तिच्या विचाराविषयी लिहिलं आहे. हे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं जातंय.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, “लोक तुमच्याबद्दल बोलत राहतील, तुम्ही काय करत आहात किंवा कराल किंवा तुम्ही जे काही एन्जॉय करत आहात याचा त्यांना काही फरक पडत नाही, ते तुमच्याबद्दल बोलतच राहतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णेश आणि तृप्ती यांनी एकमेकांचे फोटो इन्स्टावर शेअर केले होते. पण आता तृप्तीने तिचे कर्णेशसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. एवढंच नाही तर दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. तसेच कर्णेशनेही त्याच्या अकाउंटवरील तृप्तीच्या चित्रपटांचे फोटोही डिलीट केले आहेत.