scorecardresearch

“तिने मिशा लावून…” ‘तू झुठी मैं मक्कार’ फेम अभिनेत्रीने सांगितला कंगना रणौतचा ‘तो’ किस्सा

कंगना रणौतला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे

kangana ranaut new
फोटो : इंडियन एक्सप्रेस

कंगना रणौत बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष तिने विविध पठडीतल्या भूमिका साकारल्या. तर आता ती दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. तिच्या अभिनयाचे तिने साकारलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक झालं आहे. नुकताच तिचा वाढदिवसदेखील होऊन गेला आहे. कंगनाबद्दल नुकतंच एका अभिनेत्रीने वक्तव्य केलं आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री मोनिका चौधरीने कंगनाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. मोनिकाने अरविंद गौर या प्रख्यात नाट्य दिग्दर्शकाबरोबर लग्न गाठ बांधली आहे. कंगनासारख्या अभिनेत्रीला त्यांनी घडवलं आहे. मोनिकानेहिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं की “गौर कायमच कंगनाबद्दल बोलत असतो. त्याने असं सांगितलं की, कंगना खूपच मेहनती आहे. ती जेव्हा चंदीगढ येथे शिकत असताना नाटकात काम करत होती. तेव्हा एका नाटकात पुरुष पात्र साकारणारा अभिनेता आजारी पडला तेव्हा कंगनाने त्याची भूमिका केली होती. त्यासाठी तिने मिशी लावली होती. तिच्यात खूप क्षमता आहे. एका अभिनेत्याने संधीचा कसा उपयोग करावा हे तिच्याकडून शिकले पाहिजे.” अशी प्रतिक्रिया मोनिकाने दिली आहे.

घटस्फोटानंतर सिंगल असलेल्या समांथाला चाहत्याने विचारला रिलेशनशिपबद्दलचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

कंगनाचा जन्म १९८७ साली हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. लहानपणापासूनच तिला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. पण या गोष्टीला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याने वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं. घर सोडल्यानंतर कंगना दिल्लीला गेली आणि तिथे तिने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. तिच्या मॉडलिंगच्या करिअर मधूनच तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.

२००६ साली गँगस्टर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही तिला मिळाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि तिच्या अभिनयाच्या जोरावर तिला एका पाठोपाठ एक चित्रपट ऑफर होत गेले. लवकरच ती इमर्जन्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:58 IST

संबंधित बातम्या