आपल्या अभिनयाने, परखड मतांमुळे कायमच चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे अनुपम खेर. सारांशापासून ते आजतागायत गेली अनेकवर्ष ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सोशल मीडियावरदेखील ते कायम सक्रिय असतात. अभिनेते अनुपम खेर हे अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळे आहेत, याची प्रचिती अनेकदा प्रेक्षकांना आली आहे. अमिताभ बच्चन त्यांच्यावर का रागवतात याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

अनुपम खेर यांचा ऊंचाई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या संदर्भात एका पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबाबत आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ‘जेव्हा मला कळले की बोमन इराणीला हा चित्रपट करण्यासाठी जमत नाही. तेव्हा मी त्याला फोन करून समजावले की दिग्दर्शकाची इच्छा आहे तुला या चित्रपटात घेण्याची त्यामुळे हा चित्रपट तू करावा आणि तेव्हा तो तयार झाला. बोमनबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर होता आणि अर्थातच अमितजींबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळाच असतो. अमितजी माझ्यावर कायमच रागवतात कारण मी त्यांची कायम स्तुती करतो म्हणून, आखिरी रास्तापासून ते आजतागायत अमितजींबरोबर काम करणे हे माझे भाग्य समजतो’.

shashikant shinde, opposition false corruption allegations, mahesh shinde, shashikant shinde criticise mahesh shinde, satara lok sabha seat, ncp sharad pawar, sharad pawar, lok sabha election 2024,
सातारा: भ्रष्टाचार केला असता तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो- शशिकांत शिंदे
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?

चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना परिणीती म्हणाली, “बॉक्स ऑफिसवरची कमाई ही… “

अनुपम खरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. कधी नायक, कधी खलनायक, कधी चरित्र भूमिका अशा वेगवेळ्या रूपात त्यांनी प्रेक्षकांची त्यांनी मने जिंकली आहेत. नुकतीच त्यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आहे.

अनुपम खेर यांचा ऊंचाई’ चित्रपट ११ नोव्हेंबर रोजीत्रपटात अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. राजश्रीचे सुरज बडजात्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.