सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. यामुळे अनेकदा उर्फीला ट्रोलही केलं जातं. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. पण अशातच तिचा एक वेगळाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

उर्फी जावेद आणि कपड्यांचे खूप खास नातं आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. उर्फीचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. परंतु अशा कपड्यांमुळे अभिनेत्रीच्या शरीरावर जखम होऊन तिला वेदना होतात. अलीकडेच उर्फीने हिरवा नेट असलेला ड्रेस परिधान केला होता. आता तिने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्या ड्रेसमुळे झालेल्या दुखापतीच्या खुणा दाखवल्या आहेत.

आणखी वाचा :“माझ्या काही रिलेशनशिप्स…” दिव्या अग्रवालचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

उर्फीच्या स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट करत लिहीलं, “मी असा ड्रेस परिधान केला की मला दुखापत झाली.” उर्फीच्या मानेजवळ जखमा दिसत असल्याने तिचे चाहते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

हेही वाचा : अभिनेत्री उर्फी जावेदचा छोट्या पडद्यावर कमबॅक; सनी लिओनीबरोबर शेअर करणार स्क्रीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फी जावेदने नुकताच ग्रीन नेटचा ड्रेस परिधान केला होता. उर्फीच्या या लूकची काहींनी प्रशंसा केली तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. या ड्रेसमध्ये तिचा बिकिनी स्टाइल अरेबिक लूक दिसत होता. लोकांनी या ड्रेसला ‘मच्छरदाणी’ असे नाव देऊन त्यावर टीका केली. आता या ड्रेसमुळे जखमा झाल्या आहे.