उर्फी जावेद तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतो. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे स्तुतीपेक्षा जास्त टीकेला सामोरे जावे लागते. एका कार्यक्रमातील उर्फीचा आणखी एक बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायर होत आहे. पण या व्हिडिओमध्ये उर्फी सनी लिऑनी बरोबर पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हेही वाचा- “तिने मिशा लावून…” ‘तू झुठी मैं मक्कार’ फेम अभिनेत्रीने सांगितला कंगना रणौतचा ‘तो’ किस्सा २६ मार्च रोजी मुंबईने OTT Play Change Maker Awards 2023 चे आयोजन केले होते, जिथे टेलिव्हीजनपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात उर्फी आणि सनी लिओन एकत्र स्पॉट झाले होते. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उर्फीने सनीला पाहताच तिचा हात धरून कॅमेऱ्यासमोर आणले. त्यानंतर तिने आनंदाने सनीला मिठी मारली. पण यादरम्यान दोघांमध्ये असे काही घडले ज्याची कमेंट्समध्ये चर्चा सुरू झाली आहे. https://www.instagram.com/reel/CqQzis1gQCD/?utm_source=ig_embed&ig_rid=be188a5e-9832-4f58-a438-10138e3f7ea9 हेही वाचा- ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘भोला’ची दमदार कमाई; अजयला नव्या रुपात बघण्यात प्रेक्षक उत्सुक सनी लिऑनीला उर्फीबरोबरच्या गळाभेटीत काही रस नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याचे चाहते म्हणत आहे. एका यूजरने म्हटले की, उर्फीचे कपडे बघून सनी लिओनलाही लाज वाटली. एकाने लिहले की, "सनीला तिच्याबरोबर अस्वस्थ वाटत आहे." एका नेटकऱ्याने कमेंट केली की, "सनी तिला नीट मिठी मारत नाही कारण ते खूप विचित्र आहे. हेही वाचा- गौरी खानने शेअर केला लेटेस्ट फॅमिली फोटो; म्हणाली, “कुटुंब ते जे..” या कार्यक्रमात उर्फी जावेदने रिबसारखा टॉप घातलेला दिसला. उर्फीने या टॉपसोबत लूज बेज रंगाची पँट घातली होती. मरून लिपस्टिक आणि बन हेअरस्टाईलमध्ये उर्फी तिची बोल्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसली. सोशल मीडियावर काही लोकांना उर्फीचा हा लूक विशेष आवडला नाही.