Urmila Matondkar Mohsin Akhtar Mir Divorce: मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. उर्मिला व तिचा पती मोहसीन अख्तर मीर ८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होणार आहेत. दोघेही मागच्या काही काळापासून वेगळे राहत असून उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

उर्मिला व मोहसीन दोघेही फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात २०१४ मध्ये भेटले होते. तिथे मोहसीन उर्मिला पाहताक्षणी प्रेमात पडला होता. नंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. उर्मिला मोहसीनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोहसीन नेमका कोण आहे आणि काय करतो, याबाबत चर्चा होत आहेत. तर मोहसीन अख्तर मिरबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा – अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा ८ वर्षांचा संसार मोडला? मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी अर्ज केला दाखल

काय करतो मोहसीन अख्तर मीर?

What Mohsin Akhtar Mir do: मोहसिन अख्तर मीर हा मुळचा काश्मीरचा आहे. तो वयाच्या २१ व्या वर्षी अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला होता. २००७ मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेत तो सेकंड रनर-अप राहिला होता. मोहसीनने २००९ मध्ये ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटातून पदार्पण केले, नंतर त्याने त्याच वर्षी ‘लक बाय चान्स’ मध्ये काम केलं होतं. मग तो ‘मुंबई मस्त कलंदर’ मध्ये झळकला. त्याने ‘बी.ए. पास’ चित्रपटातही काम केलं होतं. इतके चित्रपट करूनही त्याला फारसं यश आणि प्रसिद्धी मिळाली नाही, मग त्याने व्यवसाय करायचं ठरवलं. मोहसीनने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राबरोबर काम करतो. मोहसीन व्यावसायिक आहे, त्याचा काश्मिरी भरतकामाचा व्यवसायही आहे.

Urmila Matondkar Mohsin Akhtar Mir love story 7
उर्मिला मातोंडकर व मोहसीन अख्तर मीर (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरने १० वर्षांनी लहान असलेल्या मोहसीनशी केलेलं आंतरधर्मीय लग्न; ‘अशी’ होती Love Story

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहसीनने मनीष मल्होत्राच्या फॅशन ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे. ४० वर्षांचा मोहसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याच्या अकाउंटवर काश्मीरमधील त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो फोटो पाहायला मिळतात. त्याचे उर्मिलासोबतचे काही फोटोही त्याच्या इन्स्टाग्रामवर आहेत. उर्मिला व मोहसीन यांचा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नसल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.