बॉलीवूडमधील स्टायलिश अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. सनी देओलबरोबर ‘सिंह साहेब द ग्रेट’ चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणारी उर्वशी कधी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. अशातच आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. अभिनेत्रीचा बाथरूममधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा तिचा खासगी व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काहींनी तिने पब्लिसिटी स्टंट केल्याचंही म्हटलं आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

उर्वशी रौतेलाच्या लीक झालेल्या बाथरूम व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामध्ये अभिनेत्री कपडे बदलताना दिसत आहे. पण तिचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यासारखा दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी उर्वशीने हा व्हिडीओ फॉलोअर्स वाढवण्यासाठी रेकॉर्ड केल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या कमेंट केल्या आहे. मानव मंगलानी नावाच्या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

पाहा व्हिडीओ –

‘प्रमोशनची पद्धत थोडी कॅज्युअल आहे,’ ‘घाणेरडा स्टंट,’ ‘एखाद्या चित्रपटातील क्लिप असावी,’ ‘अशा प्रकारचे पब्लिसिटी स्टंट आता आउटडेटेड झाले आहेत,’ अशा प्रकारच्या कमेंट्स यावर करण्यात आल्या आहेत.

Urvashi Rautela bathroom Video Viral 1
उर्वशी रौतेलाच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट्स)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Urvashi Rautela bathroom Video Viral 1
उर्वशी रौतेलाच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट्स)

उर्वशी रौतेलाच्या या व्हायरल झालेल्या बाथरूम व्हिडीओबद्दल बोलायचं झाल्यास तो खरा वाटत नाहीये. हा चित्रपट तिचा नुकताच रिलीज झालेला ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (जेएनयू)’ चित्रपटातील आहे, असा काही लोक दावा करत आहेत. यासोबतच काही चाहते हा चित्रपट ‘ग्रेट ग्रँड मस्ती ३’ मधील असल्याचा दावा करत आहेत. उर्वशी प्रसिद्धीसाठी बरेचदा पीआर स्टंट करत असते, त्यामुळे चाहत्यांना हा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंटही वाटत आहे. काही काळापूर्वी क्रिकेटपटू रिषभ पंतबरोबरच्या शाब्दिक वादामुळे चर्चेत राहिलेली उर्वशी रौतेला आता या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.