बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते. आता वेगळाच कारणाने उर्वशीकडे सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे. हे कारण म्हणजे तिने स्वतःच्या वाढदिवसाला केलेला खर्च.

२५ फेब्रुवारीला उर्वशी रौतेलाचा वाढदिवस असतो. दरवर्षी ती तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करते. यावर्षी देखील तिने तिचा वाढदिवस दिमाखात साजरा केला. पॅरिसला जाऊन आयफेल टॉवरवर तिने तिचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनसाठी तिने खर्च केलेली रक्कम आता समोर आली आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की त्या पैशात १ घरही येईल.

आणखी वाचा : वडापाव आवडतो की पाणीपुरी? क्रिती सेनॉन म्हणाली, “मुंबईत आल्यापासून…”

उर्वशी नुकतेच तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले. हा तिचा वाढदिवस साजरा करताना तिने लाखो रुपये खर्च केले. उर्वशीकडे २४ कॅरेट सोन्याचे कपकेक आणि १०० डायमंड जडलेल्या गुलाबांचा डायमंड केक होता आणि संपूर्ण सजावट ही हेलियम फुगे, गुलाबी आणि लाल गुलाब आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती. या वाढदिवसासाठी तिने एकूण ९३ लाख रुपये खर्च केले आहेत.

हेही वाचा : उर्वशी रौतेलाच्या ६० लाखाच्या ड्रेसची सर्वत्र रंगली चर्चा, ‘असा’ होता तिचा आकर्षक लूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता उर्वशीचा हे बर्थडे सेलिब्रेशन आणि या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ खूपच चर्चेत आले आहेत. या फोटोंवर कमेंट करत उर्वशीच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी तिचा हे सेलिब्रेशन आवडल्याचं देखील सांगितलं.