दक्षिणात्य चित्रपटांनी सर्व भारतीयांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूड चित्रपटांपेक्षाही गाजले. आजही अनेक प्रेक्षक बॉलिवूड चित्रपट सोडून दक्षिणात्य चित्रपट बघण्याला प्राधान्य देतात. प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूड कलाकारांनाही दक्षिणात्य चित्रपटांनी वेड लावलं आहे. गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांनी दक्षिणात्य चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे. तर आता अनेक बॉलिवूड कलाकारही दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. अभिनेता वरुण धवन याने आता बॉलीवूडवर निशाणा साधत दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याला दक्षिण अत्यंत चित्रपट आणि बॉलीवूड चित्रपट यांची होणारी तुलना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने मोठे विधान केले.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आणखी वाचा : ओरहान अवत्रमणीशी असलेल्या अफेअरच्या चर्चांवर अखेर जान्हवी कपूरने सोडले मौन; म्हणाली, “आम्ही दोघं…”

या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “सध्या प्रेक्षक बॉलिवूड झिडकारत आहेत. दक्षिणात्य चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे असतात. बॉलिवूडने दक्षिणात्य चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे काम केले पाहिजे. जर दक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत तर आपण त्यांच्याबरोबर मिळून का नाही काम करू शकत? किंवा दक्षिणात्य चित्रपटांसारखा चित्रपट का नाही बनवू शकत? आपण तसे केले पाहिजे. आज प्रेक्षक बॉलिवूडकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे मला हे बोलायला सोपे असले तरी प्रत्यक्षात तसे घडवून आणणे खूप कठीण आहे.”

पुढे तो म्हणाला, “माझी सुरुवातीपासून तामिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती. मला दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. एसएस राजामौली, लोकेश कनगरा, एस. शंकर या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे आमचा ‘भेडिया’ हा चित्रपट हिंदीबरोबरच, तामिळ, तेलुगू, कन्नड अशा दक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होत असल्याचा मला आनंद आहे. आज बॉलिवूड आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रेक्षक भेदभाव करत आहेत. पण आपण एक देश आहोत आणि त्यामुळे आपण एकत्र मिळून काम करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.”

हेही वाचा : ‘भेडिया’चा ट्रेलर प्रदर्शित होताच ‘आदिपुरुष’वर पुन्हा एकदा साधला नेटकऱ्यांनी निशाणा, म्हणाले…

दरम्यान वरूण धवन लवकरच ‘भेडिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. वरुणसह या चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.