प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य केलं. त्यांना नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कर देऊन गौरविण्यात आलं. कोणत्याही चित्रपटासाठी प्रत्येक अभिनेत्याची पहिली पसंती आशा पारेख यांनाच असायची. अभिन्याबरोबरच त्यांनी त्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

नुकतंच एका इवेंटदरम्यान आशा पारेख यांनी महिला कलाकारांना मिळणाऱ्या चित्रपटसृष्टीतील कामाबद्दल भाष्य केलं आहे. या चित्रपटसृष्टीत आजही अभिनेत्रींना समोर ठेवून भूमिका लिहिल्या जात नाहीत ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी उदाहरण देताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना या वयातही मिळणाऱ्या चित्रपटांचा उल्लेखही केला आहे.

आणखी वाचा : देसी गर्ल प्रियांका चोप्राला करायची आहे ‘या’ गोष्टीची तस्करी; इन्स्टाग्राम पोस्ट करत अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

आशा पारेख म्हणाल्या. “आजही अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास भूमिका लिहिल्या जात आहेत. मग आमच्यासाठी का कुणीच भूमिका लिहिण्यास उत्सुक नाही? चित्रपटासाठी ज्या भूमिका महत्त्वाच्या आहेत त्या आम्हालाही मिळायलाच हव्यात. आम्हाला अजूनही फक्त आई आणि आजीच्या भूमिकांसाठी विचारलं जात आहे.”

आणखी वाचा : “द गॉडफादर हा अत्यंत टुकार चित्रपट आहे”; रॅपर हनी सिंगचा माफिया विश्वावरील चित्रपटांबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मंचावर ज्येष्ठ अभिनेत्री तनुजादेखील उपस्थित होत्या. त्यांनीदेखील आशा पारेख यांच्या म्हणण्याला दुजोरा देत महिलांनी स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे हे स्पष्ट केलं. मध्यंतरी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही याविषयी भाष्य केलं होतं. सगळ्या महत्त्वाच्या आणि वेगळ्या भूमिका अमिताभ बच्चन यांच्यासाठीच लिहिल्या जात असल्याची खंत त्यांनीही व्यक्त केली होती.