बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट ‘फोन भूत’मुळे चर्चेत आहे. लग्नानंतर कतरिनाचा हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटात ती नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिनाबरोबरच या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्याही मूख्य भूमिका असून सध्या तिघंही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. कतरिनाने नुकतंच हॅलोविनच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. ज्यावर विकी कौशलने केलेली कमेंट चर्चेत आहे.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर डीसी कॉमिक्सची व्यक्तिरेखा Harley Quinn च्या वेशातील काही फोटो शेअर केले आहेत. कतरिना कैफच्या या फोटोंवर पती विकी कौशलने खूपच रंजक कमेंट केली आहे. विकीने कमेंट करताना राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया जोकचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. ज्या ते, “खत्म, टाटा, बाय बाय” असं म्हणताना दिसतात. त्यांचा हा डायलॉग विकीने त्याच्या कमेंटमध्ये वापरला आहे. कतरिनाच्या फोटोंवर कमेंट करताना विकीने लिहिलं, “खत्म, टाटा, बाय बाय”

आणखी वाचा- Video: विकी कौशल बनला कतरिना कैफचा दिग्दर्शक; व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान कतरिना कैफ सध्या ‘फोन भूत’च्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहे. तिचा हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे. अलिकडेच कतरिना, इशान आणि सिद्धांत यांनी बॉलिवूडच्या हॅलोविन पार्टीमध्ये एकत्र हजेरी लावली होती.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्याआधी चप्पल का काढतात? कारण आहे खास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिना कैफ आणि विकी कौशल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा दोघंही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करून एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच कतरिनाने विकीला झोपेतून उठवत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कतरिनाच्या फोटोवरील विकीची कमेंट चर्चेत आली आहे.