विकी कौशल आणि कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. विकी आणि कतरिनाने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. विकी अनेकदा त्याच्या लग्नाचे, वैवाहिक आयुष्यातले किस्से सांगत असतो. विकीने नुकताच खुलासा केला आहे की कतरिनाने लग्नाच्या दोन दिवसाआधी त्याला धमकी दिली होती. लग्न राहूदेत, असं ती म्हणाली होती. नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात.

विकीने लग्न केलं तेव्हा तो ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची शूटिंग करत होता. शूटिंगच्या तारखा आणि लग्नाच्या तारखा क्लॅश झाल्या. विकीला लग्नानंतर दोन दिवसांनी शूटिंगला बोलावण्यात आलं होतं. हे कळताच कतरिनाला राग आला आणि तिने विकीला धमकी दिली होती. विकी म्हणाला, “मी माझ्या लग्नापूर्वी चित्रपटाचा अर्धा भाग शूट केला होता आणि त्यानंतर मी माझ्या लग्नासाठी फ्लाइट घेतली. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी ते मला सेटवर बोलवत होते. एकीकडे चित्रपट निर्मात्याकडून दबाव निर्माण केला जात होता आणि दुसरीकडे कतरिनाने धमकी दिली की, दोन दिवसांनी सेटवर जायचं असेल तर लग्न राहूच दे. त्यानंतर मी निर्मात्यांना ‘नाही’ म्हणालो आणि सेटवर लग्नानंतर पाच दिवसांनी गेलो.”

“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

कतरिनाशी लग्न केल्यानंतर आयुष्य कसे बदलले हेही विकीने सांगितले. विकी म्हणाला, “लग्न खरोखरच खूप सुंदर होतं आणि आपल्यासाठी एक चांगला जोडीदार शोधणं हा खरोखरच एक आशीर्वाद आहे. चांगला जोडीदार असेल तर तुम्हाला घरी परतायची इच्छा होते. ती खूप चांगली आहे. तिच्याबोबर राहणं आणि आयुष्य एक्सप्लोर करणं खूप मजेदार आहे. मी तिच्यासोबत खूप प्रवास करत आहे, असं काहीतरी मी यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं.”

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या या मुलाखतीत विकीने खुलासा केला की एकाच इंडस्ट्रीत असूनही तो आणि कतरिना कामाबद्दल फारसं बोलत नाहीत. “आम्ही कामाबद्दल जास्त चर्चा करत नाही. आम्ही दोघं एकाच इंडस्ट्रीतून आहोत, त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलतो पण स्क्रिप्ट्स आणि इतर गोष्टींबद्दल बोलत नाही,” असं विकीने सांगितलं.