अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या डेटिंगपासून ते लग्नाच्या विधींपर्यंत सगळ्याच गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाआधी या दोघांनी कधीच रिलेशनशिप किंवा लव्हस्टोरीबाबत भाष्य केलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूडमधील कोणालाच लग्नासाठी निमंत्रण दिलं नव्हतं. राजस्थानमधील सवाईमाधोपूर येथे ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी- कतरिनाने सप्तपदी घेतली होती. पण त्याच्या खासगी स्वरुपाच्या लग्नसोहळ्याचे किस्से आजही चर्चेत असतात.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नानंतर विकीने कतरिनाच्या ६ बहिणींना लपवलेले बूट देण्याच्या बदल्यात १ कोटीपेक्षा जास्त रक्कम दिल्याचं बोललं गेलं होतं. त्यांच्या लग्नाचा हा किस्सा त्यावेळी बराच चर्चेतही होता. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा विकी कौशलने नुकताच ‘कपिल शर्मा शो’मध्ये केला आहे. लग्नात बूट लपवण्याच्या खेळात विकीने कतरिनाच्या बहिणींना काय दिलं असा प्रश्न विचारल्यानंतर विकीने लग्नातला धम्माल किस्सा शेअर केला.

आणखी वाचा-Video: मुंबई विमानतळावर कतरिना कैफला सुरक्षा अधिकाऱ्यांनी अडवलं; वाचा नेमकं काय घडलं?

विकी कौशल म्हणाला, “आम्ही दुपारी सप्तपदी घेतली होती. कतरिनाच्या बहिणी माझे बूट लपवण्यासाठी तयार होत्या आणि दुसरीकडे माझे चंदीगढमधून आलेले भाऊ त्यांना असं करू देणार नाही अशा तयारीत होते. पण सप्तपदी सुरू होताच कतरिनाच्या बहिणींनी माझे बूट लपवले. सप्तपदी झाल्यानंतर कतरिनाला लगेचच सनलाइटमध्ये फोटोसेशन करायचं होतं. त्यामुळे ती म्हणाली, चला लवकर फोटो काढू नाहीतर सूर्यप्रकाश जाईल. मला फोटो काढायचे आहेत.”

आणखी वाचा- लग्नानंतर एक वर्षाने कतरिना कैफ-विकी कौशल देणार गुडन्यूज? ख्रिसमस सेलिब्रेशनच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी कौशल पुढे म्हणाला, “कतरिनाने असं म्हटल्यानंतर मी उभा राहिलो, पण माझे बूट तिथे नव्हते. मग असं झालं की बूट चोरले गेलेत आता पैसे वैगरे द्यावे लागणार. पण सनलाइटच्या गोंधळात कतरिनाच तिच्या बहिणींवर चिडली आणि म्हणाली, त्याचे बूट आणून द्या. ती स्वतःच तिच्या बहिणींवर भडकल्याने मला काहीच पैसे द्यावे लागले नाही आणि माझे बूट मला परत मिळाले.”