Video of Ganpati Aarti at Salman Khans house goes viral: गणपती बाप्पााच्या आगमनाने सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांच्या घरीदेखील गणरायाचं आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेकांनी त्यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अशातच बॉलीवूडच्या भाईजानचा म्हणजेच सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सलमान खानच्या घरातही श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. अभिनेत्याने त्याच्या कुटुंबासह तसेच त्याच्या मित्रपरिवारासह आरती केल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या कुटुंबासह आरती करताना दिसत आहे.
तसेच वडील सलीम खान, आई सलमा खान, भाऊ अरबाज खान, सोहेल खान, बहिणी अर्पिता खान व मेहुणा आयुष शर्मा, तसेच अलविरा खान अग्निहोत्री व अतुल अग्निहोत्री, त्याची भाची अलिझेह अग्निहोत्री, पुतण्या अयान अग्निहोत्री या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
त्याबरोबरच रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख लोकप्रिय बॉलीवूड जोडपे आणि त्यांची मुलेदेखील दिसत आहेत. गणेशोत्सवासाठी अभिनेत्याच्या परिवारातील सदस्यांनी घातलेले कपडेदेखील लक्ष वेधून घेत आहेत. सलमान खानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
सलमान खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याचे कौतुक केले आहे. “गणपती बाप्पा मोरया”, “गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा”, “अशी व्यक्ती जो सर्व धर्मांचा सन्मान करतो”, “जय श्री गणेश”, “मोरया”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर काहींनी त्याच्यावर टीका केल्याचेदेखील कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.



सलमान खान अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाबद्दल, तसेच काही फोटो शेअर करताना दिसतो. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर सलमान सध्या बिग बॉस १९ चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून सलमान खान बिग बॉस या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. अनेक जण त्याच्या स्टाईलचे चाहते आहे. ज्या पद्धतीने तो स्पर्धकांना त्याच्या चुकांची जाणीव करून देतो, बरोबर असलेल्यांना शाबासकी देतो, त्या पद्धतीचे अनेक जण कौतुक करताना दिसतात.
तो सिंकदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण, हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. आता अभिनेता आगामी काळात सलमान खान कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.