अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात जामनगरमध्ये बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. शनिवारी करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांनी डान्स करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. या कलाकारांबरोबरच रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या स्पेशल डान्सने लक्ष वेधून घेतलं.

रणवीर व दीपिकाने नुकतीच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. या गूड न्यूजनंतर पहिल्यांदाच त्यांनी जामनगरमधील इव्हेंटमध्ये जोडीने हजेरी लावली. याठिकाणी दोघांनी मनसोक्त डान्सही केला. रणवीरने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील त्याचं पात्र रॉकी रंधावाच्या स्टाइलमध्ये परफॉर्मन्सची सुरुवात केली. त्यानंतर त्याने दीपिकाला बोलावलं आणि या जोडप्याने ‘गल्ला गूडियां’ या गाण्यावर डान्स केला.

धोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का?

निळी प्रिंट असलेल्या काळ्या ड्रेसमध्ये रणवीर छान दिसत होता, तर गोल्डन व चांदी कलरच्या लेहेंग्यात दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. दोघांनी मंचावर डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली. दोघांनी एकमेकांना मिठी मारून परफॉर्मन्स संपवला आणि उपस्थितांनी या जोडप्याला टाळ्या वाजवून दाद दिली.

Video : बॉलीवूडचे तीन खान आले एकत्र! अनंत अंबानींच्या प्रे-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख व आमिरचा डान्स; गाणं होतं खूपच खास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणवीर व दीपिकाच्या या डान्सची खूप चर्चा आहे. हे जोडपं लवकरच पालक होणार आहे. त्यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात गोंडस बाळाचं आगमन होणार आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर तिचा हा पहिलाच परफॉर्मन्स होता. अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये दोघांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.