Vidya Balan Talk’s About Her Waight : विद्या बालन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने हिंदी चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता तिनं इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याबद्दल सांगितलं आहे.

विद्या बालनने ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याबद्दल सांगितलं आहे. विद्या म्हणाली, “आयुष्यात पहिल्यांदाच मी कुठल्याच गोष्टीची काळजी करत नाहीये”. विद्या पुढे म्हणाली, “कळत नकळत आपण खूप काळजी करीत असतो. मी सध्या खूप आनंदी आहे. आता मी चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स वाचत आहे. नवीन लोकांना भेटत आहे आणि आता मी दोन चित्रपट करण्याचं ठरवलं आहे; पण सध्या मी त्याबाबत काहीही सांगू शकत नाही”.

विद्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी तिचा स्वत:वर विश्वास कायम असल्याचं तिच्या मुलाखतीमधून पाहायला मिळतं. अभिनेत्री म्हणाली, “मी निर्लज्जासारखी आशावादी आहे. माझा स्वत:वर खूप विश्वास आहे. मी स्वत:ला प्राधान्य देते”. पुढे अभिनेत्रीने तिला काही जण तिच्या वजनावरूनही बोलत असल्याचं म्हटलं आहे.

विद्या तिच्या वजनाबाबत म्हणाली, “काही जण मला माझ्या वजनावरून बोलतात. मी स्वत:वर काम करायला हवं, वजन घटवायला हवं, असं सागतात. पण, मला माझ्यामध्ये काहीही चुकीचं वाटत नाही. मी अजूनही मुख्य भूमिका साकारत होते. त्यामुळे मला वाटत नाही की, वजनाबाबत मी काळजी करण्याची गरज आहे”.

विद्या शेवटचं कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ४०० कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटापूर्वी विद्या ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यामध्ये प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ हेदेखील पाहायला मिळाले होते.

त्यानंतर आता विद्या रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यानं स्वत: केलं आहे. त्यामध्ये रितेशसह, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, फरदीन खान, भाग्यश्री,अभिषेक बच्चन यांसारखी मंडळी झळकणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबात सांगितलं आहे. ती म्हणाली, “हो मी नुकतंच ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. मला त्या संपूर्ण प्रवासात खूप मजा आली”.