सध्या आयपीएलची जबरदस्त हवा आहे. नुकताच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एक सामना रंगला होता. या सामन्यादरम्यान बरेच क्रिकेटचे चाहते स्टेडियममध्ये प्लॅकार्ड म्हणजेच फलक घेऊन उभे असतात. असाच एक प्लॅकार्ड नुकताच व्हायरल झाला आहे. एका लहान मुलाच्या हातातील हे फलक चांगलंच व्हायरल झालं आहे. यावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीबद्दल एक मचकुर लिहिण्यात आलेला होता.

सामन्यादरम्यान एका लहान मुलाच्या हातात हे प्लॅकार्ड होतं. त्यावर लिहिलं होतं की “विराट काका, मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?” हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. काही लोकांनी याकडे मस्करी म्हणून पाहिलं तर काही लोकांनी याला चांगलाच विरोध दर्शवला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही याबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : केवळ सहा दिवसांत १०० कोटी कमावणारा नानीचा ‘दसरा’ आता ओटीटीवर; वाचा कधी, कुठे पाहता येणार?

हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत कंगनाने याला विरोध केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये एक पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिलं की, “निरागस मुलांना अशा अभद्र गोष्टी शिकवू नका, असं करून तुम्ही स्वतःला पुढारलेल्या विचारांचे नाही मूर्ख आहात हे सिद्ध करत आहात.” नुकतंच विराट आणि अनुष्काच्या महाकाल मंदिरातील दर्शनाच्या फोटोंचं कौतुकही कंगनाने केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या लहान मुलाच्या व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोलिंग होताना दिसत आहे. एका युझरने लिहिलं की, “असं करून काही क्षणापुरतं तुम्ही लक्ष वेधून घेऊ शकता, पण हे अत्यंत चुकीचं आहे. हे अत्यंत चुकीचे संस्कार आहेत.” तर आणखी एका युझरने ट्वीट करत लिहिलं की. “जर ती वामिकाची गार्डीयन असती तर तिला नक्कीच या कृतीचा राग आला असता, ही मस्करीची गोष्ट नाही.”