बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने ते चर्चेत असतात. ते बॉलीवूडपासून ते राजकीय मुद्द्यांपर्यंत बिनधास्तपणे त्यांची मते मांडताना दिसतात. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे विवेक रंजन अग्निहोत्री कधी कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत येतात. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी ते बीफ खाण्यावरून ट्रोल झाले होते. तर आता याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. याचबरोबर ते त्यांची मतं अगदी परखडपणे मांडताना दिसतात, त्यामुळे ते भविष्यात राजकारणात इन्ट्री घेणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत ते खरोखर राजकारणात येणार की नाही हे स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा, ‘या’ विषयावर आणणार वेब सिरीज

काही दिवसांपूर्वी ते बीफ खाण्यावरून ट्रोल झाले होते. आता त्यांनी ‘न्यूज जे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी आधी अमेरिकेमध्ये राहायचो तेव्हा मी बीफ खायचो. पण आता मी सात्त्विक आहार घेतो. आता मी दुधी भोपळा खातो.” तर याचबरोबर राजकारणात येण्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “मला कोणीही काहीही करू देत पण राजकारणात येण्याचा माझा अजिबात प्लॅन नाही. मी त्याचा विचारही करू शकत नाही.”

हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. यावर्षी १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.