बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा ‘कंपनी’ हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर त्याने ‘साथिया’, ‘युवा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, या दरम्यान विवेक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आला होता. ऐश्वर्या राय आणि त्याचं अफेअर त्यानंतर झालेलं ब्रेकअप या गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. दोघांच्या ब्रेकअपची कलाविश्वात खूप चर्चा झाली होती. या प्रसंगानंतर लग्न न करण्याच्या निर्णयावर विवेक ठाम होता. त्याला अजिबात लग्न करायचं नव्हतं. ऐश्वर्यानंतर त्याने कोणत्याही मुलीशी लग्न केलं नव्हतं. अशातच त्याची ओळख प्रियांका अल्वाशी झाली आणि पुढे थोड्याच दिवसात हे दोघेही लग्नबंधनात अडकले.

विवेक ओबेरॉयने नुकतीच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्याने जुन्या आठवणींना उजाळा देत त्याचं लग्न कसं अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं? याविषयी खुलासा केला. विवेकची आई सतत लग्नाच्या मागे लागली होती. परंतु, ब्रेकअपनंतर अभिनेता लग्न करण्यास अजिबात तयार नव्हता. अशातच विवेकला त्याच्या मावशीने (आईच्या बहिणीने ) प्रियांकाचं स्थळ आणलं. तिचा फोटो पाहून आणि आईच्या हट्टापायी विवेक प्रियांकाची भेट घेण्यास तयार झाला. याशिवाय, खरंच मुलगी आवडली तर आम्ही १ वर्ष एकमेकांना समजून घेण्यासाठी डेट करू त्यानंतर लग्न करू अशी अट विवेकने त्याच्या आईला घातली होती.

हेही वाचा : Video : आला आला भाऊ…; रितेश देशमुखच्या अनोख्या जॅकेटने वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, “यांची जोडी…”

विवेकने प्रियांकाला भेटण्यासाठी होकार दिला तेव्हा ती इटलीला आपल्या कुटुंबीयांबरोबर सुट्टी एन्जॉय करत होती. त्यामुळे अभिनेता प्रियांकाला भेटायला इटलीला गेला. फ्लॉरेन्समध्ये संध्याकाळच्या वेळी या दोघांची पहिली भेट झाली. विवेक सांगतो, “मी एका कॅफेमध्ये वाट पाहत असताना एक मुलगी समोरून माझ्या दिशेने चालत येऊ लागली. पायात अगदी फ्लॅट चप्पल, साधे पण सुंदर कपडे, थोडे मोकळे केस, अजिबात मेकअप केलेला नव्हता. तेव्हा माझ्या मनात आलं ‘अरे वाह! हिच्या आत्मविश्वासाची दाद द्यायला पाहिजे’ ती आली माझ्यासमोर बसली आणि म्हणाली ‘हाय मला माफ कर १० मिनिटं उशीर झाला.’ त्यानंतर आम्ही जे बोलू लागलो ते सलग दोन तास एकमेकांशी संवाद साधत होतो. वेळेचं भान राहिलं नाही आणि माझी फ्लाइट चुकली. त्यानंतर मी तिला हॉटेलवर सोडलं, तिच्या घरच्यांना भेटलो.”

हेही वाचा : “तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

vivek
विवेक ओबेरॉय व प्रियांका अल्वा यांचं लग्न

हेही वाचा : “तुम्हाला आमचे वडील म्हणणं…”, नितीश भारद्वाज यांनी सांगितली मुलीची प्रतिक्रिया; तिसऱ्या लग्नाबद्दल म्हणाले, “मी…”

विवेक पुढे म्हणाला, “त्याच्या दुसऱ्यादिवशी मी काही कपडे भाड्याने घेतले कारण, माझ्याकडे काहीच सामान नव्हतं. मी बरोबर सकाळी ११ वाजता तिच्या हॉटेलकडे पोहोचलो. त्याठिकाणी मला पाहून तिच्या घरचा प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता. सर्वांना भेटून नंतर आम्ही लाँग ड्राइव्हला गेलो. मी तिला पुन्हा घरी सोडण्याआधी एकच गोष्ट सांगितली. बघ मला माहितीये की, तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, मी तुला एवढंच सांगेन की, मी आयुष्यात फक्त तुझ्याशी लग्न करेन बाकी कोणाशीच नाही. तू तुझा वेळ घे आणि मला सांग.”

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेकला प्रियांका एवढी आवडली होती की, आईला सांगितल्याप्रमाणे वर्षभर वाट न पाहता प्रियांकाचा होकार आल्यावर हे दोघेही २०१० मध्ये लग्नबंधनात अडकले. २९ ऑक्टोबर २०१० मध्ये बंगळुरूमध्ये या दोघांचा विवाह थाटामाटात पार पडला. विवेकची पत्नी प्रियांका अल्वा ही कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. प्रियांका सामाजिक कार्यकर्ता असून अनेक NGO साठी प्रियांकाने काम केलेलं आहे. या जोडप्याला विवान वीर आणि अमेय निर्वाण अशी दोन मुलं आहेत. अलीकडेच अभिनेता रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या ओटीटी सीरिजमध्ये झळकला होता.