Vivek Oberoi: अभिनेता विवेक ओबेरॉय एकेकाळी ऐश्वर्या रायबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. ऐश्वर्या सलमानशी ब्रेकअप केल्यावर विवेकबरोबर नात्यात होती, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. विवेक आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलत असतो. आता त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल सांगितलंय. एका बालपणीच्या मैत्रिणीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता असंही म्हणाला. ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, त्यांची कधीच फसवणूक केली नाही, त्यांच्याबद्दल प्रामाणिक होतो, असं विवेकने सांगितलं. विवेकने प्रियांका अल्वाशी लग्न केलं आहे. प्रियांका कधीच आधीच्या रिलेशनशिपबद्दल विचारत नाही, असं विवेक म्हणाला.

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विवेकला त्याच्या आधीच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं. उत्तर देत विवेक म्हणाला, “माझ्या खूप कमी गर्लफ्रेंड अशा होत्या, ज्यांच्याबद्दल मी गंभीर होतो. मी कॉलेजमध्ये असताना ठरवलं होतं की सिरिअस रिलेशनशिपमध्ये पडायचं नाही, कारण मी त्यावेळी शिकत होतो आणि बिझनेसही सुरू केला होता. मी शेअर बाजारात गुंतवणूक करत होतो. माझ्याकडे फार वेळ नव्हता. त्यामुळे गंभीर आणि कमिटमेंट असलेली नाती मला नको होती. माझ्या लहानपणीच्या एका मैत्रीणीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होत्या, त्यामुळेही मी सिरिअस रिलेशनशिपमध्ये पडायचं नाही असं ठरवलं होतं.”

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

मी कधीच फसवणूक केली नाही – विवेक

तो पुढे म्हणाला, “मला जास्त हार्टब्रेक नको होते, त्यामुळे मी ठरवलं की कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये राहायचं, कारण तेच माझ्यासाठी योग्य होते. कॅज्युअल नात्यातील बऱ्याच जणींना मी गर्लफ्रेंड्स समजत नाही. पण जेव्हा जेव्हा मी खरंच प्रेमात पडलो, तेव्हा त्यांच्यावर मी मनापासून प्रेम केलं, मी त्यांच्याबद्दल प्रामाणिक होतो आणि त्यांची मी कधीच फसवणूक केली नव्हती. माझ्या त्या नात्यांमध्ये पारदर्शकता होती.”

“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विवेक म्हणाला होता की त्याच्या लग्नात त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्स आल्या होत्या. “मी माझ्या बऱ्याच कॅज्युअल एक्स गर्लफ्रेंड्सबरोबरची मैत्री जपली होती आणि त्यापैकी बऱ्याच जणी माझ्या लग्नाला आल्या होत्या,” असं विवेकने सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
vivek oberoi with wife priyanka alva
विवेक ओबेरॉय व त्याची पत्नी प्रियांका अल्वा (फोटो – इन्स्टाग्राम)

मला लग्नच करायचं नव्हतं – विवेक

काही सिरिअस रिलेशनशिपमध्ये आलेल्या कटू अनुभवांबद्दल विवेकने सांगितलं होतं. विवेक म्हणाला, “मला लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे मी ब्रेकअप करत होतो. मी म्हटलं आता सिरिअस रिलेशनशिप नकोच, कारण त्यामुळे खूप ताण येत होत होता आणि मी खूप गोंधळलो होतो. मला असं वाटत होतं, ‘लग्न का करायचं?’ मग माझी आई म्हणाली, ‘या एका मुलीला भेट, तिला भेट आणि तुला ती आवडली नाही तर तू नकार दे. यानंतर मी तुला कधीच कोणत्याही मुलीला भेट असं बोलणार नाही, फक्त हिला भेट” असं विवेक म्हणाला होता. विवेक आईच्या सांगण्यावर जिला भेटला, ती प्रियांका होती. विवेक व प्रियांका यांनी २०१० मध्ये लग्न केलं. त्यांना दोन अपत्ये आहेत.