आजही कित्येक तरुण कलाकारांना लाजवेल असा उत्साह असणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे कायम त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. आजही त्यांच्या घराबाहेर त्यांचे लाखों चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी फार आतुर असतात. दर रविवार बिग बी हे त्यांचे घराबाहेर येऊन त्यांच्या चाहत्यांची भेट घेतात, पण आता बिग बी यांचे शेजारी होण्याची संधी चालून आली आहे.

या महानायकाच्या घराच्या बाजूला त्याचा शेजारी म्हणून राहायला कोणाला आवडणार नाही? आता ही आयती संधी चालून आली आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते आता त्यांचे शेजारी बनू शकतात. कसं तेच आपण जाणून घेणार आहोत. अमिताभ बच्चन यांच्या जुहू परिसरातील ‘जलसा’ या बंगल्याच्या बाजूचाच एक बंगला लिलावात काढला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

आणखी वाचा : ८०० कोटी मानधन घेणारा जगातला सर्वात महागडा दिग्दर्शक, ज्याच्या ८ चित्रपटांनी मिळून केली १००० कोटींची कमाई

‘आर्थिक मालमत्तेचे सुरक्षितीकरण आणि पुनर्बांधणी आणि सुरक्षिततेची अंमलबजावणी’ या कायद्याअंतर्गत ‘जलसा’च्या बरोबर बाजूच्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात येणार आहे. ३३३९ स्क्वेअर फिट या परिसरात उभ्या असलेल्या या बंगल्याचा लिलाव २७ मार्च रोजी करण्यात येणार आहे. या बंगल्याची किंमत २५ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. ‘डच बँक’कडून या बंगल्याचा लिलाव पार पाडण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांचा शेजारी म्हणून राहण्यासाठी २५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्याशी त्यांच्या चाहत्यांचे एक भावनिक कनेक्शन आहे. गेल्या ४० वर्षांपासून अमिताभ बच्चन त्यांच्या या बंगल्याबाहेर येऊन त्यांच्या चाहत्यांची भेट घेतात. दर रविवारी तुम्हाला बिग बी यांच्या घराबाहेर असंख्य चाहत्यांची गर्दीही पाहायला मिळते. बिग बी आता लवकरच प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात बिग बी यांच्याबरोबर दीपिका पदूकोण, प्रभास, कमल हासनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.