मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे जिम लूक्स, तिचा नवीन टॉक शो, आयटम नंबर या तिच्या कामाव्यतिरिक्त मलायका ही अर्जुन कपूरबरोबरचे नाते आणि तिचा आधीचा पती अरबाज खानपासून घेतलेल्या घटस्फोटामुळे बरीच चर्चेत असते. आता मलायका तिच्या वयामुळे चर्चेत आली आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे मलायकाचे वय नेमके किती, हा प्रश्न समोर आला आहे.

घटस्फोटाआधी मलायकाने एक्स पती अरबाज खानसह दिग्दर्शक साजिद खानच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये मलायका आणि अरबाज यांच्या वयातील अंतरावर बरीच चर्चा झाली. याच टॉक शोमधील एक छोटीशी क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “गँग्स ऑफ वासेपूर हा माझ्यासाठी शाप…” अनुराग कश्यपचं विधान चर्चेत; नेमकं असं का म्हणाला ‘केनडी’चा दिग्दर्शक?

या टॉक शोमध्ये साजिद खानने मलायकाची ओळख करून देताना ती अरबाजपेक्षा दोन वर्षांनी मोठी असल्याचा खुलासा केला होता. या कार्यक्रमात साजिद म्हणाला, “अरबाजपेक्षा तू दोन वर्षं मोठी आहेस, तर आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यावर नेमकं कसं वाटतं?” आता या व्हिडीओवरून नेटकरी वेगवेगळे तर्क लावताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
The actual age of Malaika Arora.
byu/hailyou2022 inBollyBlindsNGossip

या व्हिडीओतील गोष्टी खऱ्या आहेत, असं मानलं तर अरबाज खानचं वय हे ५५ वर्षं आहे, त्या हिशेबाने मलायकाचं वय ५७ असायला हवं असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. विकिपीडियानुसार मलायकाचं वय हे ४९ आहे, त्यामुळे मलायकाचं नेमकं वय आहे तरी किती याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. शिवाय मलायकाचा बॉयफ्रेण्ड अर्जुन कपूर हा तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. यासाठीच तिने आपलं वय कमी दाखवलं आहे असा काही लोकांचा समज आहे. आता नेमकं तिचं वय किती, हे फक्त मलायकाच आपल्याला सांगू शकते. मीडिया रिपोर्टनुसार लवकरच मलायका आणि अर्जुन लग्नबंधनात अडकणार आहेत.