scorecardresearch

Premium

‘हे’ आहे राजकुमार रावचं खरं आडनाव, बदलण्याचं कारण सांगत म्हणालेला, “माझ्या नावामुळे खूप…”

काय आहे राजकुमार रावचं खरं आडनाव? आधी आडनावच लावायचा नाही, पण नंतर लावलं ते आडनाव वेगळंच, जाणून घ्या त्यामागची कहाणी

rajkummar rao surname
राजकुमार राव

अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. चित्रपटसृष्टीतील कौटुंबीक पार्श्वभूमी नसतानाही त्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. एकापेक्षा एक हटके भूमिका साकारत राजकुमारने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज ३१ ऑगस्ट रोजी तो त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने आपण त्याचं खरं आडनाव व त्याने मूळ आडनाव का बदललं याबाबत जाणून घेणार आहोत.

‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत सहाव्या दिवशी मोठी वाढ, बजेट अवघे ३५ कोटी पण आतापर्यंत कमावले तब्बल…

amruta khanvilkar himanushu malhotra
“आता आमच्यात प्रेम…” अमृता खानविलकरचे पती हिमांशूबरोबरच्या नात्याबद्दल थेट वक्तव्य, म्हणाली “ते रिलेशन…”
sai tamhankar
“मला अजूनही हे घर…” सई ताम्हणकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “उद्या…”
Kangana Ranaut on India Vs Bharat says I dont Hate India Word It Is Our Past
“माझी जीभ घसरते अन्…”, कंगना रणौतचं ‘त्या’ मुद्द्यावर वक्तव्य; म्हणाली, “मला भारतीय दिसायचं नव्हतं, कारण…”
Zeeshan Ayyub says OTT celebrated even useless content
“OTT वरील फालतू गोष्टींनाही चांगलं म्हटलं जातं”, हड्डी फेम अभिनेत्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “ओटीटी भ्रष्ट…”

अनेक मुलाखतींमध्ये राजकुमारने त्याच्या खऱ्या आडनावाबद्दल सांगितलंय. तसेच ते का बदललं याचं कारणही तो सांगतो. राजकुमारचं खरं आडनाव राव नसून यादव आहे, म्हणजेच त्याचं खरं नाव राजकुमार यादव आहे. आडनाव बदलण्यामागचं कारण राजकुमारने सांगितलं. एका शोमध्ये राजकुमार म्हणाला, “मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर माझं आडनाव लावत नव्हतो. मात्र माझ्या नावामुळे खूप गोंधळ उडत होता कारण इंडस्ट्रीमध्ये आधीच काही राजकुमार होते. राजकुमार संतोषी, राजकुमार गुप्ता, राजकुमार हिरानी हे दिग्गज होते. ”

“मी १५ व्या वर्षापासून त्यांचं कर्ज फेडलं”, गश्मीरने सांगितली वडिलांनी घर सोडल्यावरची परिस्थिती; म्हणाला, “बँकेत हाता-पाया पडून…”

पुढे राजकुमार म्हणाला, “मला अनेकदा कॉल यायचे ज्यात लोक मला असिस्ट करा म्हणायचे आणि मी गोंधळून जायचो. मी अभिनेता आहे तर असिस्ट का करू? तेव्हा माझ्या लक्षात आलं की तीन दिग्दर्शकांची नावं राजकुमार असल्याने हा गोंधळ होत आहे. त्यामुळे मी आडनाव लावण्याचा निर्णय घेतला.”

यावेळी राजकुमारने आपलं यादव आडनाव न वापरता राव का लावलं, हेही सांगितलं. हरियाणामध्ये आपलं आडनाव यादव आहे, पण तिथे यादवांच्या मुलांच्या नावापुढे अनेकदा राव हे टोपण नाव दिलं जातं. त्यामुळे आपण यादव न लावता राव हे आडनाव लावलं, असं राजकुमार म्हणाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is rajkummar rao real surname know why he changed hrc

First published on: 31-08-2023 at 08:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×