शाहरुख खानचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट चांगलाच चर्चेत आहेत. चित्रपटातील गाण्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करायचीही मागणी होत आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख आणि या चित्रपटातील कलाकारांनी यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनची पद्धत बदलली आहे.

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सध्या शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग वापरत त्याच्या चाहत्यांशी बऱ्याचदा संवाद साधतो आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला काही तास राहिले असताना त्याने पुन्हा या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा : बॉलिवूडचे दुसरे शोमॅन सुभाष घई सध्या आहेत कुठे? दिग्दर्शनातून त्यांनी काढता पाय का घेतला? जाणून घ्या

यादरम्यान एका चाहत्याने “पठाण प्रदर्शित झाल्यावर काय करणार? चित्रपट पाहणार का बॉक्स ऑफिस नंबर्स?” असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने त्याचा पुढचा नेमका बेत काय आहे याचा खुलासा केला. शाहरुख त्याला उत्तर देताना म्हणाला, “उद्या मी फक्त माझ्या मुलांबरोबर निवांत बसणार आहे, बास आणखी काही नाही.” यावर काही लोकांनी ट्विट करत उद्या चाहत्यांसाठीसुद्धा वेळ काढ अशी अपेक्षा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असून पटापट शोज हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. याच दीपिका पदूकोण अॅक्शन मोडमध्ये आणि जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणासारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.