AR Rahman Birthday Special: संगीतसृष्टीवर आपला ठसा उमटवणारे भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो.

आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणारे रेहमान हे जन्माने मुस्लीम नाही तर हिंदू होते. रेहमान जन्माने हिंदू होते, पण वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. धर्मांतर करण्यामागे त्यांच्या आईचा प्रभाव राहिला. ए. आर. रहमानची मुलगी खतीजा रहमानला मध्यंतरी तिच्या पोषाखावरून बरंच ट्रोल करण्यात आलं होता. रेहमान यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे त्यामुळे ते त्यांच्या मुलीवर हिजाब किंवा बुरखा घालण्याची सक्ती करत आहेत अशा चर्चादेखील रंगल्या होत्या.

आणखी वाचा : सिगरेटचे चटके, लैंगिक शोषण, शारीरिक छळ; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचे सलमान खानवर गंभीर आरोप

या सगळ्या ट्रोलर्सना खतीजा रहमानने सडेतोड उत्तर दिलं होतं. तो व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खतीजा म्हणाली, “मी हा पोषाख करते म्हणून मला हिणवलं जातं. शिवाय यामध्ये माझ्या वडिलांना विनाकारण खेचलं जात आहे. हा माझा पोषाख आहे आणि मी तो स्वखुशीने स्वीकारला आहे. जेव्हा तुम्ही एका प्रसिद्ध परिवाराशी जोडलेले असता तेव्हा तुमच्या निवडीबद्दल कायम तुमच्या घरच्या मंडळींना जबाबदार धरलं जातं हे दुर्दैवी आहे.”

या जुन्या व्हिडिओमध्ये खतीजा हिने प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांच्या ट्वीटलाही उत्तर दिलं होतं. तस्लीमा यांनीसुद्धा खतीजाच्या पोषाखाविषयी आपत्ती व्यक्त केली होती. “जेव्हा तस्लीमा नसरीन यांनीसुद्धा माझ्या पोषाखाबद्दल टिप्पणी केली तेव्हा यावर भाष्य करणं गरजेचं आहे असं मला वाटलं. माझ्या आई वडिलांनी कधीच मला माझे निर्णय घेण्यात किंवा निवड करण्यात आडकाठी केली नाही. आपण स्त्रियांकडे केवळ वस्तू म्हणून बघणं थांबवायला हवं. एका कापडाच्या तुकड्याहून वेगळं असं माझं स्वतंत्र अस्तित्त्व आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वादावर मध्यंतरी खुद्द रेहमान यानीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “माझ्या मुलांचं संगोपन अशापद्दतीने झालं आहे की त्यांना चांगलं आणि वाईट यामधील फरक समजतो. त्यांना जे योग्य वाटतं ते करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. खतीजाचा हिजाब घालण्याचा निर्णय हा केवळ एका धार्मिक परंपरेशी जोडलेले मुद्दा आहे. तिला हिजाब घालायला आवडतो आणि म्हणून ती तो वापरते. तिने कोणते कपडे वापरावेत हा तिचा निर्णय आहे. मी या टीकेवरुन कोणाबद्दलही मनामध्ये द्वेष ठेवलेला नाही”