अभिनय क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना टॅलेंटच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. आज दिशाचा ३०वा वाढदिवस आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तिने तिच्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयापेक्षा ती तिच्या बोल्ड आणि हॉट लूक्समुळे आणि नृत्यकौशल्यामुळे प्रचंड चर्चेत असते.

दिशाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं तर ती पायलट होण्यासाठी मुंबईत आली होती. आज दिशा सलमान खानसारख्या बड्या स्टार्सच्या चित्रपटात आपल्याला दिसते, पण याच दिशाला एकदा बॉलिवूड निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर हिने तिच्या चित्रपटातून काढलं होतं. २०१९ मध्ये एकता कपूर निर्मित ‘केटीना’ या चित्रपटासाठी दिशा पटानीला घेण्यात आलं होतं, पण नंतर कोविडमुळे हा चित्रपट रखडला आणि अद्याप त्याबद्दल काहीच अपडेट मिळालेले नाहीत.

आणखी वाचा : १५ कोटींचं बजेट, ९१२ कोटींचा व्यवसाय; ‘पठाण’, ‘RRR’, किंवा ‘दंगल’ नव्हे तर ‘हा’ आहे सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

मात्र ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार या प्रोजेक्टमधून एकता कपूरने दिशा पटानीला बाहेरचा रस्ता दाखवल्याचं वृत्त समोर आलं. दिशाच्या ‘अव्यावसायिक’ वर्तणूकीमुळे एकता कपूरने तिला बाहेर काढल्याचं स्पष्ट झालं. लॉकडाउननंतर जेव्हा या चित्रपटावर काम सुरू झालं तेव्हा दिशा आणि बालाजी मोशन पिक्चर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरुन खटके उडाले होते. काही वैचारिक भिन्नता आणि क्रिएटिव मतभेद असल्याने एकता आणि दिशामध्ये बऱ्याचदा खटके उडले.

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे शेवटी दिशा पटानीला या चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘केटीना’ हा चित्रपट एकता कपूरच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला आहे, अन् त्यासाठीच सगळं सुरळीत पार पडावं म्हणूनच हा निर्णय घेतला गेल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. यानंतर यातील भूमिकेसाठी श्रद्धा कपूर आणि तारा सुतारिया यांची नावं समोर आली, पण अद्याप या चित्रपटाबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.