सनी देओलच्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. छप्परफाड कमाई करत या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही मागे टाकलं. प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. यामुळेच याचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे पुन्हा चर्चेत आले. ‘गदर एक प्रेम कथा’ या पहिल्या भागाचेही दिग्दर्शन त्यांनीच केले आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या ‘तेहलका’ या चित्रपटादरम्यानचे किस्से सांगितले आहेत.

या चित्रपटात अनिल शर्मा यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना बिकिनी परिधान करण्यास भाग पाडले होते. याबद्दलच त्यांनी खुलासा केला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, जावेद जाफरी, आदित्य पंचोली हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. त्यांनादेखील या सीनदरम्यान बिकिनी परिधान करावी लागली होती.

आणखी वाचा : नसीरुद्दीन शाह – अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ की चित्रपटांवर टिप्पणी करणारे ‘हौशी’ समीक्षक?

‘बॉलिवूड ठिकाना’शी संवाद साधताना अनिल शर्मा म्हणाले, “या तिघांना बिकिनीमध्ये पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. या कलाकारांची या सीनसाठी मनधरणी कशी केली याबद्दल अनेक लोक विचारतात, खासकरून नसीरुद्दीन शाह यांना यासाठी कसं तयार केलं असं बरेच लोक विचारतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अनिल शर्मा म्हणतात, “जेव्हा ही गोष्ट नसीर यांना सांगितली तेव्हा ते मस्करीत मला म्हणाले की, तू जर मला फाटके कपडे दिले असतेस तर मी तुला सवाल केला असता, तू तर मला बिकिनी परिधान करायला देत आहेस तर मी कशाला सवाल करू? दिग्दर्शकाला जे हवं आहे ते देणं अभिनेत्याचं काम आहे. खऱ्या आयुष्यात थोडीच मी असा वावरणार आहे.” अशा रीतीने तो सीन कोणत्याही अडचणीशिवाय चित्रित झाल्याचं अनिल शर्मा यांनी सांगितलं.