बॉलीवूडच्या किंग खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भारतात ७५ कोटींच्या आसपास तर जगभरातून १२० कोटींची कमाई पहिल्याच दिवशी ‘जवान’ चित्रपट करेल, असा अंदाज लावला जात आहे. अशा या जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री झळकली आहे. ती म्हणजे गिरीजा ओक. गिरीजाने ‘जवान’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

हेही वाचा – ‘वीडी 18’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला दुखापत; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अलीकडेच गिरीजा ‘जवान’ चित्रपटानिमित्ताने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने जेव्हा तिचा मुलगा कबीर पहिल्यांदा शाहरुख खानला सेटवर भेटला तेव्हा त्याची रिअ‍ॅक्शन काय होती? याबद्दल सांगितलं.

हेही वाचा – ‘जवान’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने मागितली होती सहकलाकारांची माफी; किस्सा सांगत गिरीजा ओक म्हणाली…

गिरीजा ओक म्हणाली की, “जेव्हा माझा मुलगा कबीर पहिल्यांदा शाहरुख खान सेटवर भेटला तेव्हा तो टक्कलवाल्या लूकमध्ये होता. जसा शाहरुख त्याच्याकडे वळला कबीर काही सेकंदासाठी पाहतच बसला. त्याला कळलं नाही तो शाहरुख खान आहे. कारण टक्कलच्या लूकमध्ये तो फार वेगळा दिसत होता. पण जेव्हा चार-पाच सेकंदाने त्याला लक्षात आलं की, हा शाहरुख खान आहे. तेव्हा चेहरा आश्चर्य चकीत होणार होता. हा क्षण माझ्या कायम आठवणीत राहिली.”

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटासाठी अभिनेत्री गिरीजा ओकची ऑडिशन कशी झाली? तिनेच सांगितला किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख, गिरीजा व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, संजीता भट्टाचार्य हे सर्व महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय दीपिका पदुकोणने कॅमिओ भूमिका केली आहे. तसेच या चित्रपटात संजय दत्त देखील झळकला आहे.