Neetu Kapoor on Ranbir Kapoor and Deepika Padukone Relationship: बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या नात्यांबद्दल मोठी चर्चा होताना दिसते. दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांचे नाते हा बराच काळ चर्चेचा विषय होता. आता दोन्ही कलाकार आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी आजही त्यांच्याबाबत चर्चा होताना दिसते.

जेव्हा ते वेगळे झाले, तेव्हा दीपिकाने रणबीरने तिला फसवल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी रणबीरची आई नीतू कपूर यांनी सर्वांसमोर येत मुलाची बाजू घेतली होती.

रणबीर कपूरने दीपिका पादुकोणची फसवणूक केल्यानंतर नीतू कपूर म्हणालेल्या?

या संदर्भातील नीतू कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या म्हणालेल्या, “त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या, असे मला वाटत नाही. त्याला एकच गर्लफ्रेंड होती आणि ती दीपिका होती. मला वाटते की, त्यांच्या नात्यामध्ये कशाचीतरी उणीव होती. त्यामध्ये कोणत्या तरी गोष्टीची कमतरता होती. तो व्यक्ती म्हणून जसा आहे, तसा तो त्या नात्यात नसावा. त्याला ब्रेकची गरज होती. सगळ्यांच्या रिलेशनशिप असतात; पण नात्यातून बाहेर पडल्यानंतर ते पुढे जातात. जर ते नाते परफेक्ट असते, तर त्यांना ब्रेकअप केले नसते.”

रणबीर एका ठिकाणी मुलाखतीला गेल्या होता. त्या कार्यक्रमात नीतू कपूर यांनी व्हिडीओद्वारे त्याच्याबद्दल व्यक्त केल्या होत्या. हा व्हिडीओ या कार्यक्रमात शेअर करण्यात आला होता.

दीपिका पादुकोण रणबीर कपूरबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर काय म्हणालेली?

दीपिका एका मुलाखतीत म्हणालेली, “जर मला फसवलं जात असेल, तर मी त्या रिलेशनशिपमध्ये का राहू? त्यापेक्षा एकटं राहून आयुष्याचा आनंद घेतलेला कधीही चांगलं आहे. पण, सगळे जण असा विचार करत नाहीत. मला वाटतं की, त्यावेळीच मला माझ्या भूतकाळातदेखील त्रास सहन करावा लागला आहे. त्यानं माझी माफी मागितली म्हणून मी त्याला एक संधी दिली. हा माझा मूर्खपणा होता. लोक मला सांगत होते की, तो मला फसवत आहे. त्यानंतर मी त्याला रंगेहाथ पकडले. मला या सगळ्यातून बाहेर पडायला वेळ लागला. पण, आता कोणत्याही गोष्टीमुळे मी त्या रिलेशनशिपमध्ये परत जाऊ शकत नाही.”

“पहिल्यांदा जेव्हा त्यानं मला फसवलं तेव्हा मला वाटलं की, या नात्यात किंवा माझ्यात काहीतरी गडबड आहे. काहीतरी चुकीचं घडत आहे. पण, त्याच गोष्टी सतत घडतात, तेव्हा चूक माझी नसून त्याची आहे हे समजते. मी नात्यात खूप काही देते आणि त्या बदल्यात जास्त अपेक्षा करीत नाही. पण, फसवणूक हीच नात्यात अडथळा आणणारी गोष्ट आहे. एकदा ती आली की, आदर निघून जातो, विश्वास निघून जातो आणि हे अशा नात्यातील लोकांशी जुळवून घेणे अशक्य होते.”

दीपिका असेही म्हणालेली, “ब्रेकअपनंतर मला याची जाणीव झाली आहे की, मी एका गोष्टीमध्ये किंवा एका व्यक्तीमध्ये स्वत:ला गुंतवले नाही पाहिजे. मला स्वतःला सावरावे लागले. ब्रेकअपनंतर मी खूप रडले; पण मी आता व्यक्ती म्हणून स्वत:मध्ये बदल केले आहेत. एक चांगली व्यक्ती बनली आहे आणि त्यासाठी मी त्याचे आभार मानते.”

२०११ मध्ये रणबीर कपूरने ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाची फसवणूक केल्याचे मान्य केले होते. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांनी तमाशा, ये जवानी है दिवानी व बचना ए हसीनो यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.