पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खान यांच्या अटकेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. क्रिकेटचं मैदान ते राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या इम्रान खान यांचे चाहते भारतातही तुम्हाला पाहायला मिळतील.

कित्येक कलाकार मंडळीही इम्रान यांचे चाहते आहेत. याच चाहत्यांमध्ये एक नाव किंग खान शाहरुख खानचंही आहे. इतर भारतीयांप्रमाणेच शाहरुखही क्रिकेटचा चाहता आहे, पण तुम्हाला माहितीये का की इम्रान खान यांनी शाहरुख खानला चांगलंच फटकारलं होतं. स्वाक्षरी घ्यायला गेलेल्या शाहरुख खानवर इम्रान खान चिडले होते. तोच किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : जबरदस्त ॲक्शन, सस्पेन्स अन् सनी लिओनीचा भन्नाट अंदाज; अनुराग कश्यपच्या ‘केनडी’चा टीझर प्रदर्शित

‘फॅन’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांच्याशी संवाद साधताना खुद्द शाहरुख खानने या गोष्टीचा खुलासा केला होता. शाहरुख म्हणाला, “त्यावेळी दिल्लीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू होता. त्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांची कामगिरी चांगली न झाल्याने संपूर्ण संघाची अवस्था बिकट होती. मी त्यावेळी स्टेडियममध्ये होतो आणि मला इम्रान खान यांची स्वाक्षरी घ्यायची संधी मिळाली. मी त्यासाठी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा ते माझ्यावर चिडले, अन् मला ओरडून परत पाठवलं.”

आणखी वाचा : “मी त्याच्या गालावर किस करत…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या कुब्रा सैतचा नवाजुद्दिनबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे शाहरुख म्हणाला, “त्यावेळी मला थोडं वाईट वाटलं कारण तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. पण क्रिकेटर म्हणून मी त्यांचा कायम चाहता राहीन.” कालांतराने इम्रान खान यांची भेट झाल्यावर शाहरुखने हा किस्सा त्यांना सांगितला. शाहरुख खान आता ‘पठाण’नंतर ‘जवान’मधून आपल्यासमोर येणार आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.