‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल ठाकूर ही आताच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य, तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीतही तिच मोठे योगदान आहे. कमी काळातच प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या चित्रपटातून मृणालने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच मृणालने तिला आलेल्या एका विचित्र अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.

मृणाल ही फार सेक्सी दिसत नाही म्हणून एका दिग्दर्शकाने तिला रिजेक्ट केलं असल्याचा खुलासा तिने केला होता. यानंतर मृणालने त्या दिग्दर्शकाला किमान लुक टेस्ट घेण्याची विनंती केली. नंतर त्या दिग्दर्शकाने मृणालची माफीही मागितली. पण याआधीही अशा प्रकारे बऱ्याचदा तिच्या शरीराबद्दल भाष्य केलं गेलं असल्याचा खुलासाही तिने केला. इतकंच नव्हे तर बऱ्याचदा मृणालला वजन कमी करण्याचा सल्लादेखील देण्यात आला होता.

आणखी वाचा : १३३ कोटींची कंपनी १५ कोटींना विकत घ्यायचा ‘लेन्सकार्ट’च्या सीइओचा प्रस्ताव; ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासातील भन्नाट डील

मृणालने एका गाण्यात काम करणार होती. त्यावेळी तिच्या आजूबाजूच्या काही लोकांनी तिला हे गाणं न करण्याचा सल्ला दिला. मृणालच्या मांड्या फार जाड आहेत अन् त्यामुळे त्या गाण्यासाठी तिने तिच्या मांड्यांवरील अतिरिक्त मांस कमी करण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना मृणाल या घटनेबद्दल म्हणाली, “मी एक गाणं केलं तेव्हा मला बऱ्याच लोकांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला कारण माझ्या मांड्या फार जाड होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हणाल्या, माझ्या मांड्या जाड आहेत यात काहीच गैर नाहीये. जर मला त्या गोष्टीची अजिबात अडचण होत नाही, तर तुम्ही एवढी चिंता का करता?”

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ मध्ये मराठी चित्रपट ‘विटी दांडू’मधून मृणालने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. तर हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ‘तूफान’, ‘जर्सी’, ‘सेल्फी’, ‘गुमराह’, ‘लस्ट स्टोरीज २’सारख्या चित्रपटातून मृणालने तिच्या अभिनयाची छाप सोडली. २०२२ च्या ‘सीता रामम’ या चित्रपटाने तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. आता मृणाल प्रभासच्या आगामी ‘कल्कि 2989 AD’ मध्ये छोट्या भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.