चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा ’12th Fail’ हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित जाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा १ कोटी रुपये कमावण्यात यशस्वी ठरला. यामध्ये विक्रात मेस्सीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रांनी एक किस्सा सांगितला आहे. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्यावर त्यांनी राष्ट्रपतींसमोर लालकृष्ण अडवाणींशी वाद घातला होता.

चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, त्यावेळचा एक किस्सा सांगितला आहे. चोप्रा यांनी एकदा भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या मंचावर दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी ४ हजार रुपयांसाठी वाद घातला होता. चोप्रा दिल्लीत त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते, तेव्हा हा प्रकार घडला होता. त्यावेळी अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री होते आणि नीलम संजीव रेड्डी देशाचे राष्ट्रपती होते.

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या महिलेने लांबवला लाखोंचा ऐवज; चोरीची पद्धत वाचून चक्रावून जाल

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत चोप्रा म्हणाले, “मी स्टेजवर होतो. मला भारताच्या राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला, पण माझे लक्ष रोख पारितोषिकावर होते. जेव्हा मला लिफाफा देण्यात आला तेव्हा माझ्या लक्षात आले की तो खूप पातळ आहे. मी तो स्टेजवरच उघडला आणि तिथे एक पोस्टल ऑर्डर पाहिली ज्यावर ‘सात वर्षानंतर एन्कॅश करण्यायोग्य’ असं लिहिलं होतं.”

चोप्रा पुढे म्हणाले, “ते पाहताच मी लालकृष्ण अडवाणींना म्हणालो, सर, ही पोस्टल ऑर्डर आहे, पण मला सांगितलं होतं की ते ४ हजार रुपये रोख असतील. त्यावर अडवाणींनी सात वर्षांनी दुप्पट रक्कम मिळेल असं सांगितलं. पण मी त्यांना म्हटलं की मला आता रोख रक्कम हवी आहे. त्यावर अडवाणीजींनी मला सांगितलं की ही रोख रक्कमच आहे आणि त्यांनी मला पुढे जाण्यास सांगितलं. पण मी तिथून हलायला तयार नव्हतो.”

“फरहानने मुलींच्या जन्म प्रमाणपत्रात धर्माच्या रकान्यात…”, जावेद अख्तर यांचा खुलासा

पुढे विधू विनोद चोप्रा म्हणाले, “हे सर्व स्टेजवर घडत होतं त्यामुळे राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करत मला काही अडचण आहे का? असं विचारलं. मी त्यांना म्हटलं की हो मोठी अडचण आहे. त्यानंतर मी राष्ट्रपतींना सगळं सांगितलं. दरम्यान अडवाणी मध्ये बोलले तेव्हा मी त्यांना म्हटलं की ही पोस्टल ऑर्डर तुमच्याजवळ ठेवा आणि मला रोख पैसे द्या. त्यानंतर मला अडवाणींनी दुसऱ्या दिवशी शास्त्री भवनात येण्यास सांगितले. पण मला ते पटलं नाही. त्यामुळे मी राष्ट्रपतींना म्हटलं की अडवाणींनी रोख बक्षीस दिले नाही तर मी तुम्हाला फोन करेन. त्यावेळी राष्ट्रपती मला म्हणाले, ‘अडवाणी एक चांगले व्यक्ती आहेत.'”

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

लालकृष्ण अडवाणी यांनी मंचावर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी चोप्रा शास्त्री भवनात पोहोचले, पण त्यांना पाहून अडवाणी फार खूश झाले नाहीत. त्यांनी चोप्रांना म्हटलं की तुझ्या वडिलांशी मला बोलायचं आहे. चोप्रा शास्त्री भवनात घडलेला प्रसंग सांगत म्हणाले, “अडवाणी मला म्हणाले की मला तुझ्या वडिलांना विचारायचे आहे की हे भारताचं भविष्य आहे का? एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता राष्ट्रपतींसमोर आणि राष्ट्रीय टेलिव्हिजनवर ४ हजार रुपयांसाठी भांडत आहे. तुझ्या वडिलांना फोन कर,” असं संतापलेले अडवाणी चोप्रा यांना म्हणाले.

पुढे विधू विनोद चोप्रा म्हणाले, “हे ऐकताच माझा संयम सुटला आणि मी अडवाणींना विचारलं, तुम्ही नाश्ता केलाय का? कारण मी नाही केला. मी कोणाकडून तरी १२०० रुपये उसने घेऊन इथे आलो आहे. मी पुरस्कार सोहळ्यासाठी नवीन शर्ट खरेदी केला आणि एसी चेअर कारमधून प्रवास करून इथवर आलो. ज्या व्यक्तीकडून मी पैसे घेतले आहेत, आता त्याला मी काय सांगू? तुम्ही तुमचे ‘भाषण’ बाजूला ठेवा आणि माझे चार हजार रुपये द्या, नाहीतर मी राष्ट्रपतींकडे जाणार आहे.”

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर अडवाणींनी चोप्रा यांच्यासाठी नाश्ता मागवला आणि नंतर ऑर्डरवर सही केली. अशा रितीने शेवटी विधू विनोद चोप्रा यांना राष्ट्रीय पुरस्काराबरोबर मिळालेले ४ हजार रुपये मिळाले. ही आपली पहिली कमाई होती, असं चोप्रा यांनी सांगितलं. त्यानंतर, अडवाणींनी चोप्रा यांची अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली होती, कारण त्यांना त्यांच्या १९७८ साली आलेल्या ‘अॅन एन्काउंटर विथ फेसेस’ या माहितीपटासाठी अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले होते. अमेरिकेला जायला आपल्याकडे पैसे नव्हते, असं चोप्रांनी नमूद केलं.