scorecardresearch

‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री

प्रियाने शाहरुखबरोबर ‘जोश’ चित्रपटातही केलं होतं काम, पण आता रुपेरी पडद्यापासून दूर असलेली प्रिया आहे तरी कुठे

‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री
(फोटो – सोशल मीडियावरून साभार)

‘पहली पहली बार मोहब्बत की है….’ या गाण्यातील अभिनेत्री तुम्हाला आठवत असेलच. जवळपास दोन दशकं उलटली आहे, पण हे गाणं आजही अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. हे गाणे ऐकल्यावर यातील अतिशय सुंदर अभिनेत्रीचा चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतो. पण, ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून अभिनय जगतापासून दूर आहे. या अभिनेत्रीचं नाव प्रिया गिल आहे. तर, प्रिया सध्या कुठे आहे आणि काय करतेय, हे जाणून घेऊयात.

प्रियाने प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरबरोबर ‘सिर्फ तुम’ या चित्रपटात काम केलं होतं. यानंतर तिने शाहरुख खानसमवेत ‘जोश’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रिया गिल इंडस्ट्रीपासून दूर आहे. त्यामुळे एवढी सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आता नक्की कुठे आहे आणि काय करतेय, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक आहेत.

“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…

प्रिया गिल १९९५ मध्ये मिस इंडियाची फायनलिस्ट राहिली होती. यानंतर १९९६ मध्ये तिने ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या पहिल्या चित्रपटात तिने प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसीसह स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामागिरी करू शकला नव्हता, पण प्रियाच्या सौंदर्याने मात्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ती तिच्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटासाठी खास ओळखली जाते.

सोनमने न्यूड सीन देण्यास नकार दिला अन् निर्मात्यांनी तिला…., तब्बल ३३ वर्षांनी अभिनेत्रीचा खुलासा

प्रिया गिलने तिच्या करिअरमध्ये सलमान खान, शाहरुख खान, संजय कपूर, नागार्जुन आणि सुश्मिता सेन यांसारख्या बड्या स्टार्सबरोबर काम केलं होतं. पण तिचे ‘श्याम घनश्याम’, ‘बॉर्डर हिंदुस्तान का’ आणि ‘जीतेंगे हम’ हे काही चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर तिने मल्याळम आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र १० वर्षांतच प्रिया अभिनय जगतापासून दूर गेली.

‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….

प्रिया गिल शेवटची २००६ मध्ये आलेल्या ‘भैरवी’ चित्रपटात दिसली होती. यानंतर ती अभिनय जगतापासून कायमची दूर झाली. बॉलिवूडपासून दूर असलेल्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात आहेत, पण प्रिया सोशल मीडियावरही सक्रिय नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियाने लग्न केलं असून ती डेन्मार्कमध्ये स्थायिक झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 20:07 IST

संबंधित बातम्या