Aditya Chopra Rani Mukerji : बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत. या जोडप्याला आदिरा नावाची एक मुलगी देखील आहे. दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. तो लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतो. आदित्य व राणी त्यांच्या मुलीला मीडियापासून दूर ठेवतात आणि आजपर्यंत त्यांच्या मुलीचा फोटो लोकांसमोर आलेला नाही.
राणी मुखर्जीने आदित्यबरोबर प्रेमविवाह केला. पण राणी ही आदित्यची पहिली पत्नी नाही. राणी आदित्यची दुसरी बायको आहे. राणीने घटस्फोटित आदित्यशी लग्न केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का त्याची पहिली पत्नी कोण होती?
राणी मुखर्जीच्या आधी आदित्य चोप्राच्या आयुष्यात पायल खन्ना होती. आदित्य व पायल एकत्र शिकले आणि शाळेपासून ते चांगले मित्र होते. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि नंतर त्यांनी कुटुंबियांच्या संमतीने लग्न केले. आदित्य चोप्राच्या आईवडिलांनाही पायल खन्ना आवडायची. त्यामुळे २००१ मध्ये आदित्य व पायल खन्ना यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यावेळी आदित्य चोप्रा ३० वर्षांचा होता.
८ वर्षांनी आदित्यने पायलपासून घेतला घटस्फोट
आदित्य चोप्राचे पायलशी लग्न झाल्यानंतर काही काळाने त्याचे नाव राणी मुखर्जीशी जोडले जाऊ लागले. त्यानंतर आदित्य व पायल यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. आदित्यच्या आईवडिलांना पायल खन्ना आवडायची, त्यामुळे ते त्यांच्या सुनेची बाजू घ्यायचे. एकदा असं झालं की आदित्यचं पायलशी भांडण झालं आणि तो घर सोडून निघून गेला. सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित हे नातं सुधारेल, पण जेव्हा नात्यात सुधारणा व्हायची काहीच आशा उरली नाही तेव्हा या दोघांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या ८ वर्षांनंतर २००९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पायल फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून दूर राहून आयुष्य जगतेय.

पायलपासून घटस्फोट घेतल्यानंतर आदित्य राणीबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसू लागले. जेव्हा जेव्हा राणीला आदित्यबद्दल विचारलं जायचं, तेव्हा ती या नात्याला नकार द्यायची. सुरुवातीला आदित्यचे आई-वडील या नात्याबद्दल खूश नव्हते. त्यांनी आदित्यला घर सोडून निघून जाण्यास सांगितलं होतं. नंतर काही काळाने ते राणी व आदित्यच्या नात्यासाठी तयार झाले. नंतर राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांनी इटलीमध्ये साध्या पद्धतीने आणि लग्न केलं होतं.