Farhan Akhtar Birthday: अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरचा आज ४९ वा वाढदिवस आहे. फरहान अख्तरला इंडस्ट्रीतील त्याचे मित्र आणि चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. फरहानने दोन लग्न केली आहेत. पहिली पत्नी अधुना अख्तरशी त्याने लग्नाच्या १६ वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉडेल शिबानी दांडेकरशी लग्न केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुमची लाचारी…” बाजीराव पेशव्यांची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याने शरद पोंक्षे ट्रोल

फरहानचं आयुष्य फार चढ-उतारांनी भरलेलं राहिलंय. तो दिग्गज गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पहिली पत्नी हनी इराणी यांचा मुलगा आहे. जावेद अख्तर यांनी शबाना आझमींशी लग्न केल्याने हनी इराणी त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या. मुलगी जोया अख्तर आणि फरहानचं पालन-पोषण त्यांनीच केलं. फरहानने मुंबईतील माणेकजी कपूर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि एचआर कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला.

९ लाख रुपये घेऊन ‘बिग बॉस’ मराठीतून बाहेर पडताच राखी सावंतसाठी वाईट बातमी; स्वतःच माहिती देत म्हणाली…

फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर मुस्लीम असले तरी ते नास्तिक आहेत. तर त्याची आई इराणी झोरास्ट्रियन कुटुंबातील आहे आणि त्याही नास्तिक होत्या. त्यामुळे त्यांनी कोणत्याही धार्मिक शिक्षणाशिवाय मुलांचे संगोपन केले. म्हणून फरहान अख्तर नास्तिक आहे आणि तो कोणताही धर्म मानत नाही. आपण नास्तिक असल्याचे फरहान अनेकदा जाहीरपणे सांगत असतो.

सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

२००० मध्ये फरहान अख्तरने स्वत:हून सहा वर्षांनी मोठ्या हेअर स्टायलिस्ट अधुना भाबानीशी लग्न केलं होतं. दोघांनी लग्नाआधी जवळपास ३ वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. ‘दिल चाहता है’च्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटाद्वारे अधुनाने हेअरस्टायलिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.या लग्नापासून दोघांना शाक्या आणि अकिरा या दोन मुली आहेत. लग्नाच्या १६ वर्षानंतर, फरहान आणि अधुना यांनी ते घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं आणि २०१७ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर फरहान शिबानी दांडेकरच्या प्रेमात पडला. दोघांनी ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फेब्रुवारी २०२२मध्ये लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why honey irani and javed akhtar son farhan akhtar is atheist know details hrc
First published on: 09-01-2023 at 17:21 IST