अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी व डॉ. नेने यांनी इतकी वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय का घेतला, यामागचं कारण सांगितलं आहे.

डॉ. श्रीराम नेने म्हणाले, “मी २० वर्षे हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला मी तीन ते पाच केसेस सांभाळत होतो. फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्सही खूप होते. माझे खूप रुग्ण बरे झाले, ते पाहून मलाही छान वाटायचं. पण डॉक्टर होण्यापूर्वी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सगळं टेक्नॉलॉजीचं काम करत होतो. मला २०११ मध्ये वाटलं की भारताला खूप गरज आहे, त्यामुळे मी तिथून इथे आलो.”

बॉलीवूडचा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, देशभरात कमावले फक्त १० हजार रुपये; तुम्ही पाहिलाय का?

डॉ. नेने यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा त्यांनी ‘एबीपी माझा’ ला दिलेल्या मुलाखतीत केला. “मी इथे यायचा निर्णय घेतल्यावर माझ्या महाराष्ट्रीय आई-वडिलांना धक्का बसला. कारण मी एका हॉस्पिटलचा हेड होतो. एका वर्षात ५०० केस सांभाळत होतो आणि ते सगळं सोडून मुंबईला यायचं. पण आता त्यांना कळलंय की मी हेल्थकेअर, शिक्षण आणि चित्रपटांसाठी कंपन्या बनवल्या आहेत,” असं ते म्हणाले.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

“आपला हेतू काय आहे आणि त्यातून आपल्याला किती आनंद मिळतोय हे आपण बघायला हवं, कारण ते आपल्याला शाळेत नाही शिकवत. आम्ही मुलांनाही सांगितलंय की तुम्हाला हवं ते करा. आमची मुलं आमच्या दोघांच्या क्षेत्रापैकी कुठे जाणार माहिती नाही. खरं तर भारताला फक्त डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि वकील नको आहेत, सगळ्या प्रकारचे लोक पाहिजेत,” असं डॉ. नेने म्हणाले.

सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी परत भारतासाठी नक्कीच आलो, संस्कृतीसाठी आलो कारण भारताची संस्कृती व्यवस्थित आहे. त्यातही महाराष्ट्राची संस्कृती जास्त व्यवस्थित आहे,” असं डॉ. श्रीराम नेने म्हणाले. तर मुलं तिथं (अमेरिकेत) एका वेगळ्याच वातावरणात वाढतात, त्यामुळे भारतात लोक कसे जगतात हे त्यांना कळावं म्हणून परत येण्याचा निर्णय घेतला होता, असं माधुरी दीक्षितने सांगितलं.