चार वर्षं रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यावर एकाच वर्षी तीन चित्रपट ब्लॉकबस्टर देणाऱ्या किंग खान म्हणजेच शाहरुख खानची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ‘पठाण’मधून जबरदस्त कमबॅक, नंतर ‘जवान’सारखा रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपट आणि नंतर ‘डंकी’सारखा आशयघन चित्रपट देऊन शाहरुख खानने पुन्हा सिद्ध करून दाखवलंय की बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह अजूनही तोच आहे. पण एवढं सगळं सुरळीत सुरू असताना अचानक शाहरुखने त्याचं करिअर संपवण्याबद्दल शाहरुखने भाष्य का केलं असावं? तेच आपण जाणून घेणार आहोत.

शाहरुख खान हा दुबईचा ब्रॅंड अम्बॅसेडर आहे नुकतंच त्यांनी तिथे आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड गर्वनमेंट समिट’मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुखने उपस्थित असलेल्या लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या अन् या मुलाखतीमध्ये त्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. हॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल तसेच चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकबद्दलही शाहरुखने अगदी मनसोक्त गप्पा मारल्या.

आणखी वाचा : नव्या चित्रपटाची घोषणा करून अक्षय कुमारने मोडला स्वतःचाच नियम; नेटकरी म्हणाले, “५० कोटीसुद्धा…”

मुलाखतीदरम्यान शाहरुखला विचारण्यात आलं की त्याच्या या मोठ्या करिअरमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी अजून करायची राहिली आहे. या प्रश्नाचं शाहरुखने त्याच्या नेहमीच्या हटके स्टाइलमध्ये उत्तर दिलं. शाहरुख म्हणाला, “मला माझं करिअर आता संपवायचं आहे (जे अजूनही शेवटापासून फार लांब आहे) अजून मला ३५ वर्षे काम करायचं आहे. या ३५ वर्षांत मला एक असा चित्रपट बनवायचा आहे जो साऱ्या जगाने पाहायला हवा अन् कौतुक करायला हवं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच झीरो फ्लॉप झाल्यानंतर शाहरुखने तीन टे चार वर्षांचा मोठा ब्रेक घेतला होता. त्यादरम्यान शाहरुखच्या मनात नेमकं काय सुरू होतं त्याबद्दलही त्याने भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “अगदी खरं सांगायचं झालं तर २०१८ ते २०२३ या कालावधीत मी कोणत्याची चित्रपटाची कहाणी वाचली नाही किंबहुना मी कोणत्याही चित्रपटाबद्दल घरात भाष्यही केलं नाही. मी घरी होतो, माझ्या कुटुंबाबरोबर मी वेळ घालवला अन् मी या कालावधीत मी घरी पिझ्झा बनवायला शिकलो.” ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’नंतर शाहरुख आता काय घेऊन येणार याकडे आता चाहते आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.