सारा अली खान आणि विकी कौशल सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विकी-साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या कास्टिंगबाबत भाष्य केले आहे. तसेच चित्रपटात‘सौम्या’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री सारा अली खानची निवड का केली याबाबतही दिग्दर्शकांनी खुलासा केला आहे. हेही वाचा : हृतिक रोशनला बालपणीच भेटला होता विकी कौशल; IIFA सोहळ्यातील व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्याने शेअर केला ‘तो’ जुना फोटो ‘जरा हटके जरा बचके’मधील 'सौम्या'च्या भूमिकेसाठी सारा अली खानची निवड करण्याबाबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, "आम्हाला भूमिकेसाठी नायिकेमध्ये एक देसी अंदाज हवा होता, तो साराच्या रूपाने आम्हाला मिळाला. छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारताना साराची ग्लॅमरस प्रतिमा कधीच आडवी आली नाही. तिने ही भूमिका अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीप्रमाणे निभावली आहे. एक दिग्दर्शक म्हणून मला पडद्यावर थोड्या वेगळ्या भूमिका उभ्या करायच्या आहेत. यापूर्वी 'मिमी' चित्रपटात क्रिती सेनॉनने सुद्धा गर्भवती स्त्री आणि आईची भूमिका साकारली होती, अगदी प्रेक्षकांनीही त्या चित्रपटाला पसंती दिली. त्याचप्रमाणे, सारा लहान शहरातील नायिकेच्या भूमिकेला चांगला न्याय देईल, असा विश्वास मला होता." हेही वाचा : मलायकाच्या गर्भधारणेच्या अफवांवर अर्जुन कपूरचे सडेतोड उत्तर; म्हणाला, “वस्तुस्थिती तपासल्याशिवाय काहीही गोष्टी…,” दरम्यान, 'जरा हटके जरा बचके'च्या प्रमोशनसाठी विकी कौशल आणि सारा अली खान सध्या राजस्थान, लखनौ, चेन्नई दौऱ्यावर आहेत. अलीकडेच अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेली आयपीएल फायनल पाहण्यासाठीही ही जोडी पोहोचली होती. हा चित्रपट उद्या म्हणजेच २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.