सारा अली खान आणि विकी कौशल सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विकी-साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या कास्टिंगबाबत भाष्य केले आहे. तसेच चित्रपटात‘सौम्या’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री सारा अली खानची निवड का केली याबाबतही दिग्दर्शकांनी खुलासा केला आहे.
‘जरा हटके जरा बचके’मधील ‘सौम्या’च्या भूमिकेसाठी सारा अली खानची निवड करण्याबाबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, “आम्हाला भूमिकेसाठी नायिकेमध्ये एक देसी अंदाज हवा होता, तो साराच्या रूपाने आम्हाला मिळाला. छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारताना साराची ग्लॅमरस प्रतिमा कधीच आडवी आली नाही. तिने ही भूमिका अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीप्रमाणे निभावली आहे. एक दिग्दर्शक म्हणून मला पडद्यावर थोड्या वेगळ्या भूमिका उभ्या करायच्या आहेत. यापूर्वी ‘मिमी’ चित्रपटात क्रिती सेनॉनने सुद्धा गर्भवती स्त्री आणि आईची भूमिका साकारली होती, अगदी प्रेक्षकांनीही त्या चित्रपटाला पसंती दिली. त्याचप्रमाणे, सारा लहान शहरातील नायिकेच्या भूमिकेला चांगला न्याय देईल, असा विश्वास मला होता.”
दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनसाठी विकी कौशल
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zara hatke zara bachke director laxman utekar opens up on casting sara ali khan in film sva 00