शाहरुख खानने अलीकडेच अनंत व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांवर परफॉर्म केलं होतं. यावेळी त्याच्यासह सलमान खान, आमिर असे कलाकार एकत्र थिरकले होते. यानंतर आता पुन्हा एकदा किंग खानच्या चाहत्यांना अभिनेत्याच्या डान्सची झलक पाहायला मिळणार आहे. ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये अभिनेत्याने खास जुन्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

२०२३ मध्ये शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने तब्बल हजार कोटींचा गल्ला जमावून संपूर्ण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यानंतर आलेल्या ‘जवान’ चित्रपटाने सुद्धा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता सगळ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये बॉलीवूडच्या या बादशहाचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येत आहे.

हेही वाचा : हॉलीवूडमध्ये ऑस्कर, तर बॉलीवूडमध्ये ‘झी सिने अवॉर्ड्स’ची चर्चा! सर्वोत्कृष्ट अभिनेता व चित्रपट ठरला…

नुकत्याच पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये शाहरुखने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. याशिवाय अभिनेत्याने या सोहळ्यात २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बतें’ चित्रपटातील लोकप्रिय सीन रिक्रिएट केल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये शाहरुखने राज मल्होत्रा ही भूमिका साकारली होती. राज व्हायोलिन वाजवून सर्वांना प्रभावित करत असल्याचा हा आयकॉनिक सीन किंग खानने या पुरस्कार सोहळ्यात तब्बल २४ वर्षांनी रिक्रिएट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पापाराझींसह अभिनेत्याच्या फॅन पेजेसवरून हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Oscar 2024 : …अन् रेसलर जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी सिने अवॉर्ड्स’ सोहळ्यात शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, चित्रपट, बीजीएम ( BGM) असे अनेक पुरस्कार ‘जवान’ने पटकावले आहेत.