brahmastra actor ranbir kapoor first salary was 250 rupees spg 93 | 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी मानधन न घेणाऱ्या रणबीरचा पहिला पगार किती होता माहितीये का? | Loksatta

‘ब्रह्मास्र’ चित्रपटासाठी मानधन न घेणाऱ्या रणबीरचा पहिला पगार किती होता माहितीये का?

रणबीरने बॉलिवुडमध्ये आज स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

‘ब्रह्मास्र’ चित्रपटासाठी मानधन न घेणाऱ्या रणबीरचा पहिला पगार किती होता माहितीये का?
bollywood actor

अभिनेता रणबीर कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाला सुरवातीला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगपासून जोरदार कमाई करण्यास सुरवात केली होती. हा चित्रपट बिग बजेट आहे, VFX, तगडी स्टारास्ट यामुळे चित्रपटाचे बजेट जास्त होते. दिग्दर्शक अयान मुखर्जी या चित्रपटावर तब्बल १० वर्ष काम करत होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले की या चित्रपटावर सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. रणबीरने या चित्रपटासाठी मानधनदेखील घेतले नाही. तो नसता तर हा चित्रपट कदाचित बनला नसता. रणबीरने जरी या चित्रपटासाठी मानधन नसले घेतले तरी त्याच्या आयुष्यातले पाहिले मानधन केवळ २५० रुपये आहेत.

कपूर खानदानात जन्मलेल्या रणबीरने लहान असताना पहिल्यांदा बालकलाकार म्हणून आर के प्रॉडक्शन्सच्या प्रेमग्रंथ या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्याला २५०,रुपये मिळाले होते. या चित्रपटांत ओम पुरी, परेश रावल, ऋषी कपूर, शम्मी कपूर, माधुरी दीक्षित अशी मोठी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचे दिगदर्शन राजीव कपूर यांनी केले होते.

दीपिका- कतरिना नाही तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर होतं रणबीरचं प्रेम, पण…

रणबीरने अभिनयात येण्यापूर्वी काही काळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. आ अब लौट चले या चित्रपटात तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते.

रणबीरने बॉलिवुडमध्ये आज स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केले आहे. कबीर सिंग चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्या animal चित्रपटात तो आपल्याला दिसणार आहे. दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्यासह त्याच्या डेटींगची बरीच चर्चा झाली होती. एवढंच नाही तर रणबीरचे नाव सोनम कपूर, नर्गिस फाखरी आणि प्रियांका चोप्रा यांच्याशीही जोडले गेले होते. 

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“त्यांची हालचाल झाली अन्…” राजू श्रीवास्तव यांच्या लेकीची भावुक पोस्ट, बिग बींचे मानले आभार

संबंधित बातम्या

“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
“…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये
‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022: उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया पहिल्यांदाच ब्राझीलला हरवण्याचा प्रयत्न करणार
Video : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…
विश्लेषण: कैद्यांच्या देवाणघेवाणीत रशियाच्या तावडीतून अमेरिकन बास्केटबॉल पटूची मुक्तता! ब्रिटनी ग्रिनर प्रकरण नेमके काय आहे? जाणून घ्या
सोलापूर: शिवसेनेत पद घेण्यास दिलीप सोपल यांचा नकार
शनिदेव डिसेंबर महिन्यात ‘या’ राशींना बनवतील श्रीमंत? २०२२ च्या शेवटच्या महिन्यात होणार अपार धनलाभ