बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या हिमाचलमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अमिताभ चक्क तीन अंश सेल्सियस तापमान असलेल्या ठिकाणी अभिनय करत आहेत. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेल्या बिग बींनी चित्रीकरण सुरु असताना काढलेला एक फोटो आपल्या चाहत्यांसाठी ट्विट केला आहे.
“ये सर्दी सर पे बीती
तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर
मन को ढकने से बाज़ रहे , यही है तक़रीर ~ अब”
T 3579 –
Yeti yeti yeti ..
ye sardi sar pe beeti ..
tan dhaka, ang dhaka .. dhaka poorn shareer
man ko dhakne se baaz rahe, yahi hai taqreer ~ ab
Yeti yeti yeti
ये सर्दी सर पे बीती
तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर
मन को ढकने से बाज़ रहे , यही है तक़रीर ~ अब pic.twitter.com/2Xhy59cmjH— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 13, 2019
T 3567 – ..minus degrees ..err like -3 .. protective gear .. and the work etiquette .. pic.twitter.com/EdB3maKZpA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 1, 2019
असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल येथे सुरु आहे.